Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या हस्ते ‘भावार्थ माउली’ या अध्यात्मिक अल्बमचे प्रकाशन संपन्न

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 15, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Bhavarth Mauli
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि, संत ज्ञानेश्वर अर्थातच माउली हे महाराष्ट्रातील महान कवी, तत्वज्ञ तसेच संत आहेत. भागवत धर्माचा तसेच वारकरी संप्रदायाचा पाया मुळापासून रचण्याचे बहुमूल्य कार्य त्यांनी केले. त्यांनी त्यांच्या एकवीस वर्षांच्या आयुष्यात ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेवपासष्टी’, ‘भावार्थ दीपिका’ यांसारखे अनेक अभंग व विरहिणी लिहिले. हे अभंग आणि विरहिणी जागरामर आहेत. यातील शिकवण हि माणसाला माणुसकीच्या मार्गावर टिकविण्याचे कार्य करते. माउलींच्या याच शिकवणीचा वारसा कायम राहावा म्हणून सारेगामा या संगीत संस्थेसोबत लता दीदींनी ‘भावार्थ माउली’ या भक्तिगीतांच्या अल्बमची अध्यात्मिक भेट गुढीपाडव्याच्या दिवशी आपणास देऊ केली आहे. याचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला आहे.

नमस्कार. आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तांसाठी एक भेट . https://t.co/uhEzAAWSvv

— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) April 13, 2021

साधारण पन्नास वर्षांपूर्वी दीदींनी सारेगामा ह्या भारतातील सर्वात मोठ्या संगीत संस्थेसोबत ‘ज्ञानेश्वर माऊली’ हा भक्तिगीतांचा अल्बम प्रदर्शित केला होता. या अल्बममध्येसुद्धा माउलींच्या काव्यपंक्ती व अभंगांवर आधारित गीतांना लता दीदींचा आवाज लाभला होता. ‘भावार्थ माऊली’ या नव्या भक्तीगीतांच्या अल्बमला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले आहे. दहा महत्त्वाच्या मराठी रचनांच्या अध्यात्मिक भावनांचा पुन्हा परिचय करून देण्यात आला आहे. प्रत्येक गाण्याचा अध्यात्म आणि दैनंदिन जीवन यांच्याशी असलेला संबंध आणि ओळीओळीत दडलेला अर्थ सांगणारे एक भाष्यही यात सादर केले गेले आहे.

This Gudi Padwa, Tune into Bhavartha Mauli by @mangeshkarlata
A Marathi devotional album of 10 tracks based on the work of Sant Dyaneshwar with special commentary on each song by Lata didi herself and composed by Pt Hridaynath Mangeshkar

Tune in now : https://t.co/HcUYTGdiq9 pic.twitter.com/8mb82GFyRn

— Saregama (@saregamaglobal) April 13, 2021

भारतरत्न लता मंगेशकर यांनी गाण्याच्या प्रदर्शनावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात होऊन गेलेल्या महान संत ज्ञानेश्वरांचे काव्यात्मक साहित्य आजच्या पिढीसमोर सादर करण्याचा मला सन्मान मिळाला. ‘भावार्थ माऊली’ या अल्बमच्या माध्यमातून मी व माझ्या भावाने, हृदयनाथने प्रत्येक कवितेतील अध्यात्माचे सार उलगडत प्रत्येक गाण्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की, ही सुंदर गाणी ऐकताना प्रेक्षकांना अध्यात्माची अनुभूती मिळेल.” पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत व लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेला हा अल्बम सारेगामाच्या युट्युब वाहिनीवर व इतर संगीतवाहिनीवर प्रदर्शित झाला आहे.

Tags: Bharatratn AwardBhavarth MauliHridaynath Mangeshkarlata mangeshkarLatest AlbumSaregama Music Company
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group