Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पालकांनी कचराकुंडीत सोडून केले अनाथ; मात्र स्वरा भास्करने पालकत्वाचा पुढे केला हाथ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 15, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Swara Bhaskar
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री स्वरा भास्कर हि तिच्या अभिनयाइतकीच ती करत असलेल्या वादग्रस्त विधानांमुळे ओळखली जाते. देशात सुरू असलेल्या विविध घटनांवर स्वरा निर्भीडपणे व्यक्त होत असते. सध्या ती सोशल मी़डियावर चांगलीच सक्रिय आहे. तसेच सोशल मीडियावरील तिचे फॅन फॉलोईंग देखील प्रचंड आहे. स्वराच्या मतांशी काही वेळा लोक सहमत असतात तर काहीवेळा असहमती दर्शवित तिला ट्रोल करतात. मात्र यावेळी स्वरा केवळ कौतुकास पात्र आहे. स्वराने एका लहान मुलीस दत्तक घेतले आहे. हि चिमुरडी कचरा कुंडीत सापडल्याचे वृत्त आहे. स्वराच्या या निर्णयाने या लहान मुलीचे भविष्य खराब होणार नाही. या कारणामुळे सोशल मीडियावर स्वराचे भरभरून कौतुक केले जात आहे.

swara

 

स्वराचे या मुलीसोबतचे फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. स्वरा नुकतीच तिच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने उत्तर प्रदेश येथील बदायु येथे गेली होती. त्यावेळी तिने तेथील एका अनाथाश्रमाला भेट दिली होती. तिथल्या अनाथाश्रमाला एखादी मदत करावी या हेतूने ती तिथे गेली होती. पण तिथे गेल्यानंतर एका लहान मुलीची कथा ऐकून तिला प्रचंड वाईट वाटले. ही चिमुकली मुलगी त्या अनाथआश्रमाच्या संचालिका प्रियांका जौहरी यांना एका कचऱ्याच्या डब्यात सापडली होती. तिची ही गोष्ट ऐकून स्वराला अश्रू अनावर झाले आणि तिने या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. स्वराने या मुलीला दत्तक घेतले असले तरी ही मुलगी काही काळासाठी त्या अनाथ आश्रमामध्येच राहाणार आहे. तिच्या पालनपोषणाचा व शिक्षणाचा सगळा खर्च स्वरा उचलणार आहे. ही मुलगी मोठी झाल्यानंतर स्वरा तिला आपल्या घरी घेऊन जाणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाहेरचे वातावरण योग्य नाही. त्यात स्वराला लहान मूल सांभाळण्याची सवय नसल्यामुळे या काहीच महिन्याच्या बाळाला स्वरा चांगल्याप्रकारे सांभाळू शकेल का? याची सगळ्यांना चिंता लागली होती. त्यामुळे स्वराने बाळाला अनाथाश्रमातच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वराच्या या निर्णयामुळे अगदी क्रिटिक्स सुद्धा यावेळी तिचे कौतुक करीत आहेत.

Tags: Adopt A Baby GirlSocial ActivitySwara BhaskarViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group