हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा मालिकेने अगदी काही काळातच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेची कथा आणि पात्रे घराघरांत पोहोचले आहेत. या मालिकेतील नायकांसह खलनायकी भूमिकांची देखील वाह वाह होतेय. मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारणारी श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा भगरे हिची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेतून आपली छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवणारी अनघा ही भगरे गुरूजींची कन्या आहे, हे काही मोजक्याच लोकांना माहित असेल.
श्वेताचे पूर्ण नाव अनघा अतुल भगरे आहे व ती भगरे गुरुजींची कन्या आहे. भगरे गुरूजी सध्या झी मराठीवर ‘वेध भविष्याचा’ आणि नुकत्याच सुरू झालेल्या पौराणिक मालिकेत पहायला मिळत आहेत. झी मराठी वाहिनीवर “घेतला वसा टाकू नको” ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित होते. हि मालिका संपूर्णतः पौराणिक कथांवर आधारित असलेल्या आपल्या सणांची माहिती देणारी आहे. त्यामुळे बहुतेक प्रेक्षकांना ही मालिका आवडली आहे. या मालिकेद्वारे भगरे गुरूजी आपल्या शैलीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात.
अनघाची ‘रंग माझा वेगळा’ ही पहिलीच टीव्ही मालिका आहे. याआधी तिने ‘अनन्या’ या गाजलेल्या नाटकातही काम केले आहे. अनघाचे शालेय शिक्षण नाशिक येथे झाले. त्यानंतर एसएनडीटी कॉलेज मुंबई येथून तिने मास कम्युनिकेशनची पदवी मिळवली. ‘कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी’ आणि ‘व्हाट्सएप लग्न’ या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून तिने जबाबदारी पार पाडली होते. याशिवाय काही काळ ‘कोठारे व्हिजन’मध्ये पीआर ब्रँड मॅनेजर पदाचा भारही ती सांभाळला होता.
Discussion about this post