Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सैफ, तैमूर आणि छोटा नवाब…!; करिनाने शेअर केला फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 16, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Kareena Kapoor
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सैफ आणि करिनाच्या घरी काही दिवसांपूर्वीच आणखी एका नवाबाचे आगमन झाले आहे. हा चिमुकला नवाब दिसतो तरी कसा हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असताना करिनाने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यात सैफ आणि तैमूर छोट्या नावाबाकडे प्रेमाने पाहत आहेत. मात्र याही फोटोत करिनाने आपल्या लाडक्या लेकाचा चेहरा जगाला दाखवलेला नाही. मात्र त्याची झलक दाखवणारा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

करिनाने इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. यात तान्हुला बेडवर पहुडलेला आहे आणि सैफ व तैमूर त्याच्यासोबत खेळताना दिसत आहेत. अर्थात या फोटोतही करिनाने बाळाचा चेहरा लपवलेला आहे. या फोटोत बाळाच्या चेह-यावर इमोजी पेस्ट करत, त्याचा चेहरा दिसू नये, याची काळजी तिने घेतली आहे़. ‘माझा विकेण्ड काहीसा असा असतो, तुमचा कसा असतो मित्रांनो?,’ असे कॅप्शन करिनाने या फोटोला दिले आहे. चेहरा दिसत नसला तरी, करिनाच्या बाळाचा हा फोटो तुफान व्हायरल होतोय. काही दिवसांपूर्वी बाळाचे आजोबा रणधीर कपूर यांच्या अकाऊंटवरचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यांनी दोन फोटोंचा एक कोलाज पोस्ट केला होता. या फोटोतील बाळ सैफिनाचा मुलगा असल्याचे मानले गेले होते. मात्र नंतर हा फोटो डिलीट करण्यात आला होता.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

करिनाने २०१६ साली पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता. यावरून करिना व सैफ दोघेही प्रचंड ट्रोल झाले होते. तैमूर लंग चौदाव्या शतकाचा एक शासक होता ज्याने तैमुरी घराण्याची स्थापना केली होती. तो खूप अत्याचारी आणि निर्दयी असल्याचे म्हटले जाते. सैफिनाने अशा शासकाच्या नावावर आपल्या मुलाचे नाव ठेवावे, यावर लोकांचा आक्षेप होता.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

या वादानंतर सैफने एका क्षणाला तैमूर हे नाव बदलण्याचाही विचार केला होता. पण करिनाचा याला विरोध होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर करिना व सैफने आपल्या दुस-या मुलाचे नाव अद्याप जाहिर केलेले नाही. शिवाय अद्याप त्याचा चेहराही जगाला दाखवलेला नाही. नावावरून भले वाद झाले असतील, पण तैमूर मीडियाच्या कॅमेरा लेन्सचा खूपच आवडता आहे. अगदी काही काळातच तैमूर बहुचर्चित सेलिब्रिटी किड्सपैकी एक झाला. आता जुनिअर से जुनिअर नवाब कधी मीडियासमोर येणार याचीच उत्सुकता आहे.

Tags: Instagram PostKareena Kapoor-khanRandheer KapoorSaif ali khanViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group