Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हैप्पी बर्थडे वरुण धवन! दहा वर्षांत १४ हिट पे हिट, स्वबळावर केले बॉलिवूडमध्ये पदार्पण; अधिक जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 24, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Varun Dhawan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याचा आज ३४वा वाढदिवस आहे. आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हटके डान्स स्टाईल, कॉमिक टायमिंग आणि किलर लुकने त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत वरुणने अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत. चॉकलेट हिरो पासून गंभीर व्यक्तिमत्वाच्या भूमिका वरुणने साकारल्या आहेत. त्याचा नॉटी अंदाज आणि खेळकर वृत्ती यामुळे त्याने प्रत्येक वयोगटातील व्यक्तींच्या मनावर राज्य केले आहे.

View this post on Instagram

A post shared by ETimes (@etimes)

वरुणने नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी मधून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले आहे. २०१० मध्ये आलेल्या ‘माय नेम इज खान’ या करण जोहरच्या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. यानंतर पुढे त्याने अ‍ॅक्टिंग क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. वरुणचे पिता डेव्हिड धवन हे बॉलिवूड क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांची नेहमीच अशी इच्छा राहिली आहे कि वरुणने आपले नाव स्वबळावर कमवावे. यामुळे वरुणची बॉलीवूडमध्ये एन्ट्री होम प्रॉडक्शनद्वारे झाली नाही. वरून धवन याचे नुकतेच नताशा दलाल सोबत लग्न झाले असून नताशा फॅशन डिझाइनर म्हणून कार्यरत आहे.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरूण धवन याने ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. हा चित्रपट अतिशय लोकप्रिय झाला. या चित्रपटातील गाण्यांनी तर तरुणाईला अक्षरशः वेड लावले होते. सुरूवातीला एक चॉकलेट हिरो म्हणून ओळखला जाणारा वरूण पुढे ‘बदलापूर’ या चित्रपटातून अनोख्या पण गंभीर भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आला. अलीकडेच वरुणने त्याच्या आगामी चित्रपटाचे शूट पूर्ण केले आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव ‘भेडिया’ आहे. या चित्रपटात वरुण सोबत क्रिती सनन हा अभिनेत्री देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुणच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर ‘स्टुडंट ऑफ द ईअर’, ‘बदलापुर’, ‘मैं तेरा हीरो’, ‘जुडवा २’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ असे एकापेक्षा एक हिट चित्रपट त्याने दिले आहेत. इतकेच नव्हे तर तो रेमो डिसूजा यांचा डान्सवर आधारित ‘स्ट्रीट डांसर ३डी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. तर ‘दिलवाले’ या चित्रपटात त्याने बॉलिवूड किंग खान सोबत आणि ‘डिशुम’ चित्रपटात त्याने जॉन अब्राहाम सोबत स्क्रीन शेअर केली होती. पुढे ‘कलंक’ चित्रपटाच्या निमित्ताने ड्रीम गर्ल माधुरीसोबतही त्याने काम केले.

Tags: Bhediyabirthday specialbollywood actorDirector Amar KoushikKriti sanonnatasha dalalupcoming movievarun dhavan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group