हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत कंगना भाजपा पक्षाची किती कट्टर समर्थक आहे, हे काही वेगळे असे सांगायला नकोच. अशात पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचा दणदणीत विजय आणि भाजपाचा पराभव झाल्यानंतर कंगनाने एकापेक्षा एक असे वादग्रस्त ट्विट केले होते. त्यातील एका ट्विटमध्ये तिने ममतांची तुलना थेट रक्तपिपासू राक्षसिणीशी केली होती. तर दुसऱ्या ट्विटमध्ये मोदींना गुंडगिरी करण्याचा सल्ला दिला होता. कंगनाने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे.
@kanganateam असे तिचे ट्विटर हॅन्डल आहे. जे सोशल मीडिया ट्विटर साईटचे नियम उल्लंघन केल्यामुळे सस्पेंड करण्यात आले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर घडत असलेल्या हिंसादायक प्रकरणांवर नेम साधत तिने ट्विट केले होते. यातील ट्विटमध्ये तिने म्हटले होते कि, ‘मी चूक होती. ती रावण नाही. रावण महान राजा होता. त्याने जगातील सर्वात श्रीमंत देश निर्माण केला होता. महान प्रशासक, बुद्धिमान, वीणावादक असा शक्तिशाली राजा होता. पण ही रक्ताची भुकेली राक्षसीण त्राटिका आहे. ज्या लोकांनी हिला मत दिले, त्यांचेही हात रक्ताने माखलेले आहेत.’ याआधी केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने ममता बॅनर्जींची तुलना रावणाशी केली होती.
इतके काय ते कमीच तर यापुढे तिने दुसऱ्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुंडगिरी करण्याचा सल्ला दिला होता. तर सन २००० वर्षाच्या सुरूवातीला दाखवले तसे ‘विराट रूप’ दाखवण्याचे आवाहनही तिने मोदींना केले. या ट्विट्समुळे कंगना जबरदस्त ट्रोल होत होती. इतकेच नव्हे तर लोक तिच्या या ट्विट्सवर संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत होते. काहींनी कंगनाला मूर्ख, मेंटल, पागलदेखील म्हटले. तर काहींनी ती हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अनेकांनी कंगनाचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्याचीसुद्धा मागणी केली होती.
परिणामी कंगनाने सोशल मीडिया वेबसाईटच्या नियमांचे उल्लंघन करणारे ट्विट्स केले आहेत. कोणतेही सोशल मीडिया वेबसाईट हिंसाचारास प्रोत्साहन देत नाहीत. तसेच या वेबसाईट्सच्या नियमावलीमध्ये हे स्पष्ट स्वरूपात लिहिलेले असते. त्यामुळे कंगनाचे ट्विट या नियमावलीचे उल्लंघन करताना आढळले असता तिच्या ट्विटर अकाउंटला सस्पेंडचा टॅग लागलेला दिसतोय. आता कुठे बरसणार आणि कुठे बरळणार कंगना? हा मोठा प्रश्न तिच्या समोर उभा ठाकला असेल.
Discussion about this post