हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. आधीहून अधिक घटक व प्राण हिरवणाऱ्या या लाटेत अनेकजण हतबल होऊन इतरांकडून मदतीची आशा करीत आहेत. दिवसेंदिवस देशात कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसतेय. यामुळे वैद्यकीय सुविधा, औषधे, रुग्णालयातील बेड्स तर अगदी ऑक्सिजनचा साथ देखील कमी पडू लागला आहे. अश्यावेळी अभिनेता सोनू सूद याने पुढाकार घेत सर्वाना मदतीचा हात पुढे केला आहे. नुकतेच एका महिलेला उपचारादरम्यान इंजेक्शनची गरज होती. यावेळी सोनू सुडाने अगदी वेळेआधीच इंजेक्शनची व्यवस्था केली आणि रुग्णाचा जीव वाचला.
Injection delivered. ☑️
Wishing a speedy recovery🇮🇳@SoodFoundation https://t.co/LDC13pXH86— sonu sood (@SonuSood) May 6, 2021
कोरोना महामारीच्या या भीषण काळात अभिनेता सोनू सूद लोकांना देवासमान भासू लागला आहे. गरजुंसाठी बेड्स आणि औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी सोनू सोदूने स्वतः पुढाकार घेतला आहे. इतकेच नव्हे तर तो हि कामगिरी जबाबदारीने पारदेखील पाडतोय. जसे जमेल तशी सोनू सूद प्रत्येकाला मदत करताना दिसतोय. नुकतेच पंजाबमध्ये राहणा-या रुपा दळवी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तातडीने त्यांना इंजेक्शनची गरज होती. याबाबत सोनू सूदला ट्विट करण्यात आले.नेहमीप्रमाणे सोनू सूदने वेळेआधीच उपचारासाठी लागणारे इंजेक्शन उपलब्ध करुन दिले.
Stay strong India 🇮🇳
Oxygen from my side on your way❤️@SoodFoundation pic.twitter.com/72prrjtw7v— sonu sood (@SonuSood) May 6, 2021
कोरोना विषाणूचा कहर वाढू लागल्यापासून सोनू गरजूंसाठी कार्यरत आहे. गेल्या वर्षभरापासून तो फक्त ५ तास झोप घेऊन १८ तास काम करतोय. त्याचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांकडून कौतुकास पात्र ठरत आहे . या कामगिरीनंतर तर पुन्हा एकदा सोनू सूदचे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत. गेल्या वर्षीपासून सुरु झालेला सोनू सूदच्या मदतीचा ओघ आजही तितक्याच किंबहुना त्याहून अधिक जोमात कायम आहे. सोनूदेखील निस्वार्थपणे जनतेची मनोभावे सेवा करताना दिसतो. परिस्थिती खूप भयावह आहे. कृपया घरात राहा, मास्क घाला आणि स्वतःला संसर्ग होण्यापासून वाचवा,’ असे सोनू जनतेला नेहमीच आवाहन करताना दिसतो.
Discussion about this post