हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या फक्त वाढतेय. या कोरोना विषाणूचा विळखा अगदी कलाकारांपर्यंत सुद्धा सहज पोचला आहे. नुसता पोचला नाहीये तर या विळख्यात अनेकांनी आपले प्राण गमावले. तर काहींनी आपले प्रियजन गमावले. नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित चित्रपट अनफ्रीडम मधील अभिनेता राहुल वोहरा याचे कोरोनामुळे निधन झाले आहे. खूप दिवसांपासून राहुल वोहरा कोरोना व्हायरसशी लढत होता. मात्र अखेर या अभिनेत्याने लढता लढता अखेरचा श्वास घेतला. थिएटर दिग्दर्शक आणि नाटक लेखक अरविंद गौरने फेसबुक पोस्ट लिहून राहुलच्या निधनाची माहिती दिली आहे. दरम्यान मृत्यूपूर्वी राहुलने आपल्याला मिळालेल्या ट्रीट्मेंटविषयी खंत व्यक्त करणारी पोस्ट लिहिली होती. या पोस्टनंतर अगदी काहीच वेळात त्याचे निधन झाले. मात्र आता या पोस्टने चांगलाच जोर धरला आहे. मात्र आता या पोस्टनंतर राहुलचा एक व्हिडीओ वायरल होतोय. या व्हिडीओने अक्षरशः खळबळ निर्माण केली आहे.
हा व्हिडीओ दिग्दर्शक व लेखक अरविंद गौर यांनी अगदी काहीच वेळापूर्वी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत स्वतः राहुल वोहरा दिसत आहे. कोरोनाने ग्रासलेला राहुल या व्हिडिओत त्याला रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल सांगतोय. तो म्हणतोय, लांबूनच निघून जातात, कुणालाही कितीही हाक मारा, कुणीही येत नाही. एक एक, दीड दीड तासाने येतात. तोपर्यंत मॅनेज करा. पाणी शिंपडा. ऑक्सिजन मास्क लावा. पुन्हा पाणी भरलं कि पुन्हा ऑक्सिजन मास्क लावा. यांच्या लासक्तच येत नाहीये कि पाणी कधी ठेवायच आहे. आणि जर कुणाला बोललो कि प्लिज हे करून द्या.. दुर्लक्ष केले जात आहे. एका मिनिटात आलो सांगून जातात ते कुणी येतच नाही. सांगा. हा ऑक्सिजन मास्क लावून काय करू मी. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या या दुर्लक्षित व्यवहाराबाबत संताप व्यक्त केला आहे.
अभिनेता राहुल वोहराने मृत्यूआधी शनिवारी रात्री फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. राहुलची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची प्रकृती अधिकच बिघडत गेली. यावरूनच त्याने फेसबुक पोस्ट लिहिली. राहुलने या पोस्टमध्ये लिहिले होते कि, ‘मला पण योग्य उपचार मिळाले असते, तर मी वाचलो असतो. तुमचा राहुल वोहरा.’ एक रूग्ण म्हणून राहुलने सगळी माहिती इथे दिली होती. सोबतच त्याने पुढे लिहिले की,’लवकरच जन्म घेईन आणि चांगल काम करेन. आता हिम्मत हरलो आहे.’ ही पोस्ट राहुलने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनिष सिसोदिया यांना टॅग केली होती.
राहुलच्या या फेसबुक पोस्टनंतर काही तासांनी थिएटर दिग्दर्शक अरविंद गौर यांनी राहुलच्या निधनाची पोस्ट केली. दिग्दर्शक अरविंद गौर यांनी अभिनेता राहुल वोहरा याच्या निधनाची बातमी दिली होती. त्यांनी लिहिले होते, ‘राहुल वोहराचं निधन झालं. माझा मेहनती कलाकार आता या जगात नाही. कालच माझं त्याच्याशी बोलणं झालं. चांगल्या उपचाराने माझं आयुष्य वाचवलं जाऊ शकतं. असं तो म्हणत होता.’
Discussion about this post