Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘द फॅमिली मॅन २’ नक्की कधी होणार रिलीज.. ? तारखांबाबत प्रेक्षकांच्या गोंधळात आणखीच वाढ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 13, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
The Family Man 2
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील वेब सिरीज ‘द फॅमिली मॅन’च्या येत्या दुसर्‍या सीझनची सर्व प्रेक्षकवर्ग आतुरतेने वाट पाहात आहेत. या वेब सिरीच्या दुसऱ्या सिजनच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत येणार्‍या अपडेटवर चाहत्यांचे नेहमीच बारीक लक्ष असते. त्याचवेळी, या मालिकेचा दुसरा सीझन कधी येणार, यासंदर्भात अॅमेझॉन प्राइमच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे चाहते सतत विविध प्रश्न विचारत असतात. अलीकडे एक बातमी आली होती की, पुढील महिन्यात द फॅमिली मॅन सीझन २ प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, यामुळे प्रेक्षकांमध्ये गोंधळ उडाला आहे.

show me a picture in your phone that has your energy. not a selfie pic.twitter.com/RYtT67MgEu

— prime video IN (@PrimeVideoIN) May 12, 2021

फॅमिली मॅन २ या सिजनची अद्याप अधिकृतपणे निश्चित तारिख जाहीर केलेली नाही, परंतु अ‍ॅमेझॉन प्राइमच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत प्रेक्षकांचा मोठा गोंधळ सुरू झाला आहे. गुरुवारी प्राईम व्हिडिओने ‘फॅमिली मॅन’ची काही छायाचित्रे पोस्ट केली. ज्यात मनोज बाजपेयी आणि प्रिया मणि यांच्या काही मुख्य भूमिका असल्याचे दाखवण्यात आले आहे. बर्‍याच सोशल मीडिया युजरने या सिजनची रिलीज डेट जाणून घेण्याकरिता अनेक प्रश्न विचारले. चाहत्यांनी विचारलेल्या या प्रश्नावर अॅमेझॉन प्राईमने उत्तर दिले की, उन्हाळ्यात सीझन २ चा प्रीमियर येईल.

https://twitter.com/LetsOTT/status/1392513332855275522

नेमके त्याचवेळी, लेट्स ओटीटीने ट्विटरवर दावा केला आहे की, द फॅमिली मॅनचा दुसरा सीझन ११ जून रोजी येऊ शकतो. त्यात म्हटले आहे की, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी भाषांमध्ये डबिंगचे काम पूर्ण झाले आहे. सीझन २ सर्व भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होईल. तर पहिल्या सीझनमध्ये मनोज बाजपेयी यांच्या टीम ऑफिसरच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता सनी हिदुजाने जागरण डॉट कॉमशी बोलताना सांगितले की, दुसऱ्या सत्रातील अधिकृत माहिती लवकरचं येऊ शकेल. एकंदर या वेबसीरिजच्या तारखेबाबत सुरु असलेला हा सावळा गोंधळ कधी थांबेल आणि हि वेब सिरीज कधी रिलीज होईल ह्याचा अंदाज लावणे जरा कठीणच आहे.

The Family Man Season 2 will premiere this summer on Amazon Prime Video! Stay tuned for further updates. -Vikash

— Amazon Help (@AmazonHelp) May 12, 2021

द फॅमिली मॅनचा दुसरा सीझन १२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र तांडव सीरिजवरून झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर त्याचे रिलीज तात्काळ थांबविण्यात आले. त्यानंतर या सीरिजचा दुसरा सीझन मे महिन्यात येणार असल्याच्या बातम्या जोरदार पसरल्या. द फॅमिली मॅनचा पहिला सीझन २० सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. या गुप्तचर थ्रिलर वेब सिरीजमध्ये अभिनेता मनोज बाजपेयी यांनी टी.ए.एस.सी. या गुप्तहेर संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक श्रीकांत तिवारी यांची भूमिका साकारली आहे.

Tags: Amazon Prime Videomanoj vajpayiThe Family Man 2The Family Man WebseriesTwitter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group