हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जघरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. अश्या संकटाच्या काळात जो तो आपापल्या परीने गरजूंसाठी मदत करत आहे. यात अनेक कलाकारांचा समावेश आहे. बॉलिवूड कलाकार या कोरोना विरुद्ध लढ्यात सामील आहेतच पण मराठी कलाकार देखील मागे नाहीत. कुणी ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन कार्यरत आहे तर कुणी रुग्णालयातील बेड्सबाबत काळजी घेत आहे. या कोरोना विरुद्ध लढाईत आता मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री देखील सामील झाले आहेत. त्यांनी कोरोनाग्रस्त मुलांना आणि कुटुंबांना दत्तक घेण्यासाठी एका एनजीओशी संपर्क केला आहे. आपल्या परीने मदत म्हणून सिनेसृष्टीतील हे जोडपे स्वतःहून पुढाकार घेत आहे.
अभिनेत्री पल्लवी जोशी आणि तिचे पती चित्रपट निर्माते पती विवेक रंजन अग्निहोत्री हे जोडपे कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी, तज्ञांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशन सत्र आयोजित करीत आहेत. हे दोघेही एकत्र मिळून आय एम बुद्धा फाउंडेशन चालवित आहेत. या संदर्भात बोलताना पल्लवी जोशी म्हणाली कि, “या समुपदेशन सत्राचे लक्ष्य लहान मुले आणि किशोरवयीन मुले आहेत, ज्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात आपले एक किंवा दोन्ही पालक गमवल्याने, मानसिक स्वास्थ्य गमावले आहे.
या कार्यासाठी या जोडप्याने ”नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स” महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या भारतीय बाल हक्क संरक्षण आयोगासह करार केला आहे. या संदर्भात बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, मुलांचे मानसशास्त्रज्ञांकडून सुयोग्य देखरेखीखाली अत्यंत कौशल्यपूर्वक सत्रे घेतली जातात.” आम्ही अशा मुलांचाही विचार करत आहोत ज्यांचे संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन आहे, कारण कधी कधी या मुलांशी वागताना, त्यांना हाताळताना बहुतेक वेळा नातेवाईक कमी पडतात.
Discussion about this post