चंदेरी दुनिया । ‘मर्दानी 2’ या चित्रपटातून निडर आणि वचनबध्द पोलिस अधीक्षक, शिवानी रॉयची भूमिका राणी पुन्हा एकदा साकारताना दिसते. राणी सक्रियपणे आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत असून त्याद्वारे दिला जाणारा संदेश संपूर्ण देशभर पोहचवत आहे. आपल्या अभियानाच्या मार्फत राणी देशभरातील पोलिसांची भेट घेऊन त्यांच्यासोबत स्त्रिया आणि मुलींविरुध्द किशोरवयीन मुलांच्या गुन्ह्यांच्या वाढत असलेल्या सामाजिक समस्येवर बोलत आहे. तसेच ती गुन्ह्यांवर वचक ठेवण्याबद्दल पोलिसांचे कौतुक करताना देखील दिसते. राणीने मुंबईच्या अत्यंत आधुनिक पोलिस कंट्रोल रुमला भेट दिली आणि आपल्या देशात सद्यस्थितीत स्त्रिया व मुलींसाठी भयंकर जोखीम गणल्या जाणाऱ्या सायबर गुन्हेगारी विषयावर चर्चा केली.
राणी सांगते, “आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी दररोज पोलिसांमार्फत केल्या जाणाऱ्या अमाप कामाला पाहून मी अक्षरश: थक्क झाले आहे. पोलिस अधिकारी अतिशय व्यावसायिक, पध्दतशीरपणे, स्वत:ची पर्वा न करता त्यांचे कर्तव्य निभावतात. आपल्या सुरक्षिततेच्या शाश्वतीसाठी ते किती कष्ट घेतात हे वास्तव डोळे उघडणारे आहे. पीसीआरला दिलेली भेट माझ्यासाठी अतिशय माहितीपर आणि शैक्षणिक स्वरुपाची ठरली, कारण वाढत्या तंत्रज्ञानामुळे गुंतागुंतीच्या बनणाऱ्या गुन्हांपासून स्त्रियांना आणि मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी काय काय केले जाते याच्याबद्दल मला माहिती घेता आली.
गुन्ह्यांवर वचक ठेवण्यासाठी अतिशय अभूतपूर्व दर्जाचे काम केले जात आहे आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठीच्या पोलिसांच्या महत्वाकांक्षेचे आणि समर्पणाचे मी अगदी मनापासून आभार मानते.”
Discussion about this post