हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता स्वप्नील जोशी याची गतवर्षी प्रदर्शित झालेली ‘समांतर’ ही एम एक्स प्लेअर वरील मराठी वेबसीरिज प्रचंड गाजली होती. यानंतर आठवड्याभरापूर्वी या सीरिजचा दुसरा सीझन समांतर २ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे आणि हि सिरीज प्रेक्षकांना अतिशय आवडते आहे. प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम आणि भरघोस प्रतिसाद पाहून स्वप्नील मात्र अत्यंत आनंदी आहे. पण या आनंदासोबतच स्वपनलीने एक खंत देखील व्यक्त केली आहे. हि खंत म्हणजे, मराठी चित्रपट ओटीटीवर चालत नाहीत.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत स्वप्नीलने आपली खंत व्यक्त केली आहे. याविषयी बोलताना त्याने मराठी सिनेमे ओटीटीवर का चालत नाहीत हे सांगताना त्यामागील वेगवेगळी करणे स्पष्ट केली आहेत. तो म्हणाला कि, ‘ओटीवर मराठी चित्रपट न चालण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एका वाक्यात असे याचे उत्तर देणे खूपच कठीण आहे. शिवाय चित्रपटाचा दर्जा काय? माध्यमांत त्या चित्रपटाची चर्चा आहे का? प्रेक्षकांना तो पाहायचा का? अशा अनेक गोष्टी यात समाविष्ट असतात. अनेक मराठी सिनेमे जागतिक पातळीवर गाजतात. पण बऱ्याचदा मराठी प्रेक्षक मात्र ते पाहण्यास उत्सुक नसतात. मराठी सिनेसृष्टीची ही खूप मोठी समस्या आहे. यावर सर्वांनी एकत्र येऊन खरं तर तोडगा शोधायला हवा. अन्यथा जे सुरू आहे, तेच सुरु राहिल.’
स्वप्नील जोशींच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच स्वप्नील एम एक्स प्लेअर वरील ‘समांतर’ या वेबसीरिजमधील मुख्य भूमिका कुमार महाजन या व्यक्तिरेखेत दिसला होता. या भूमिकेसह सीरिजच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली आहे. या वेब्सिरीजच्या पहिल्या भागानंतर अर्थातच प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची प्रतीक्षा होती. यानंतर आता ‘समांतर २’ प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर हा सीजनही प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
शिवाय या वेबसिरीजमध्ये स्वप्नीलसोबत अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि साई ताम्हणकर या दोन्हीही आघाडीच्या नायिका मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या सीझनमधील स्वप्नील आणि तेजस्विनीच्या इंटिमेट सीनने प्रेक्षकांना अतिशय आकर्षित केले आहे.
Discussion about this post