हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय ठरलेली मालिका ‘लागीर झालं जी’मधील अज्या हे पात्र साकारणारा अभिनेता नितीश चव्हाण बऱ्याच दिवसांपासून त्याच्या डान्स व्हिडिओंमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्यात तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. शिवाय त्याच्यासोबत अभिनेत्री श्वेता राजनही तिच्या नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या मणी वसू लागली आहे. सध्या हे दोघेही त्यांच्या अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील त्यांच्या डान्स व्हिडीओमुळेचे जास्त चर्चेत येत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने तयार झाला आहे. यानंतर नुकताच त्यांचा ‘गल्ल्यांन् साखली सोन्याची ह्या कोळी रिप्राईज गाण्यावरील डान्स व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे.
View this post on Instagram
सध्या अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण कोणत्याच मालिकेत काम करताना दिसत नाही. तर श्वेता राजन राजा राणीची ग जोडी मध्ये मुख्य पात्र संजीवनीच्या मैत्रिणीची भूमिका साकारत होती. या दोघांची जोडी आजकाल सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध झालेली दिसत आहे. ते नेहमीच सोशल मीडियावर एकापेक्षा एक हटके आणि दमदार डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतात आणि लोक या व्हिडिओंना मोठ्या संख्येने प्रतिसाद देताना दिसतात. आताच हा व्हिडीओ नितीश चव्हाणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. यात ‘गल्ल्यांन् साखली सोन्याची गाण्यावर ते दोघेही मनसोक्त आणि धमाल डान्स करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
छोट्या पडद्यावरील ’लागीर झालं जी’ मालिका खूप लोकप्रिय ठरली होती. याच मालिकेतून नितीश चव्हाणने रसिकांच्या मनात कायमचे घर केले. यामुळेच मालिका बंद झाली असली तरीही आजही अज्याने प्रेक्षकाच्या मनातली जागा राखून ठेवलेली आहे. त्यात तो सोशल मीडियावर इतका सक्रिय असतो कि नेहमीच त्याचे विविध लूक, स्टाईल आणि अर्थातच नृत्य शैलीशी संबंधित पोस्ट करत असतो. नितीशचा प्रत्येक लूक प्रेक्षकांमध्ये विशेषतः तरुण प्रेक्षक आणि तरुण युवतींमध्ये अत्यंत गाजतो. तर तरुण युवकांमध्ये नितीश चव्हाणचे डॅशिंग लूक चांगलेच चर्चेत असतात.
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                     
            
Discussion about this post