Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नियम पाळून चित्रीकरण करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्मात्यांना निर्देश

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 17, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्यात चित्रीकरण कोरोना विषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे, यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही, असे म्हणत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्मात्यांना निर्देश दिले आहेत. शिवाय, निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा आणि आपल्या पथकातील कलाकार व लोकांची नियमित कोरोना तपासणी करावी, लसीकरण होईल हे पाहावे अशा कडक सुचनादेखील दिल्या आहेत. चित्रपट निर्मात्यांची सर्वात मोठी संस्था असलेल्या प्रोड्युसर्स गिल्डच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत या सूचना त्यानांचयापर्यंत पोहोचविल्या. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या कोविडविषयक निर्देशांचे पुरेपूर पालन करू, अशी ग्वाही दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, निर्बंध टाकून तुम्हाला अडवणे आम्हालाही आवडत नाही, पण महाराष्ट्र आणि केरळसह इतर राज्यांमधून कोरोनाचा संसर्ग अजूनही आहे. संरक्षित बायो बबलची व्यवस्था करूनही क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमादरम्यान संसर्ग झाल्याचे दिसले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नसून, जगातील इतर देशांत तिसरी लाट उसळल्याचे दिसतेय. त्यामुळे, आपल्याला आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे निर्मात्यांनी कोरोना संदर्भात कलाकार व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करत राहणे, पथकातील कुणाला ताप आला, काही लक्षणे दिसली तर त्वरित दखल घेणे व सर्वात महत्वाचे, सर्वांचे दोन्ही लसीकरण असणे गरजेचे आहे. निर्बंध कायम न ठेवता कोरोना परिस्थितीची पाहणी करून टप्प्याटप्प्याने, सावधपणे आणि सुरक्षितरित्या ते उठवण्याबाबत राज्य शासन पाउले टाकताना सर्वांचे मोठे सहकार्य लागणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पुढे, मुंबई पोलिसांनी प्रत्येक निर्मात्यांचे चित्रीकरणाचे वेळापत्रक, चित्रीकरण ठिकाण व वेलांची माहिती निर्मात्यांकडून मागवून घ्यावी. एखाद्या अधिकाऱ्यावर समन्वयाची जबाबदारी देत नियमांची काळजी घेत असल्याची खात्री करून परवानगी द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, डॉ. शशांक जोशी, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ.प्रदीप व्यास यांनी कोरोना सद्यपरिस्थितीबाबत माहिती दिली. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी देखील यावेळी पोलिसांतर्फे नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याचे सांगितले.

या बैठकीसाठी हिंदी चित्रपट निर्मात्यांची प्रमुख संस्था असलेल्या प्रोड्युसर गिल्डचे रितेश सिधवानी, स्तुती रामचंद्र, मधु भोजवानी, राकेश मेहरा, नितीन आहुजा हे सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे सुबोध भावे, नागराज मंजुळे, रवी जाधव यांनीही बैठकीत सहभागी होऊन सूचना केल्या आहेत. तर, आदेश बांदेकर यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे सहभागी होते.

Tags: CM Uddhav ThackreyCovid 19 Rules RegulationsLive SessionProducers
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group