हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या विविध वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. परिणामी नेहमीच ती विविध प्रकारे संकटे आणि वाद ओढवून घेताना दिसते. नुकतेच कांग रनौत आणि लेखक आशीष कौल यांच्यातील कायदेशीर वादाने एकदम नवे वळण घेतले आहे. नवे वळण म्हणजे, काही दिवसांपूर्वी आशीष कौल यांनी कंगनावर कॉपी राईटचे उल्लंघन केल्याचा केवळ आरोप केला होता. मात्र आता आशीष यांनी अभिनेत्री कंगना रनौत विरोधात मुंबई हायकोर्टात थेट अवमान याचिका दाखल केली आहे.
याआधी बॉलिवूडचे गीतकार जावेद अख्तर यांनीसुद्धा कंगना रनौतविरोधात मानहानीचा दावा दाखल केला असताना आता कंगनाला आशीष कौल यांच्या अवमान याचिकेचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान आशीष यांच्या वकीलांनी सांगितले की, आम्ही जावेद अख्तर यांना पत्र लिहिले होते. त्याचे उत्तर आम्हाला मिळाले आहे. कंगनाने पासपोर्ट अर्जासाठी दिलेली तथ्ये खोटी आहेत आणि हा एक अत्यंत गंभीर गुन्हा आहे, असे आम्हाला पत्राच्या उत्तरातून कळले. आम्ही हायकोर्टात ही बाब मांडू आणि कोर्टात फसवणूक झाल्याचे सिद्ध झाल्यास त्याचा निकाल जरूर लागेल, असे वकीलांनी सांगितले आहे.
मुळात हा वाद असा आहे कि, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने काही दिवसांपूर्वी ‘मणिकर्णिका रिटर्न्स द लीजेंड ऑफ दिद्दा’ हा चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. तर हा चित्रपट ज्यांच्या पुस्तकावर आधारित आहे, त्याचे लेखक आशीष कौल हे आहेत. कंगनाच्या चित्रपट निर्मितीबाबतच्या घोषणेनंतर आशीष कौल यांनी कंगनाविरोधात कॉपी राईट उल्लंघनाचा आरोप करत कोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान हा वाद सरळ मार्गी मिटला असता मात्र मोठे होणार नाही ते प्रकरण कंगनाच्या नावाशी कसे काय संबंधित असू शकेल. त्यामुळे आता हे प्रकरण थेट मुंबई हायकोर्टात पोहोचले आहे.
Discussion about this post