Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आसाम-मिझोराम हल्ल्यात अभिनेत्रीचा जवान भाऊ जखमी; प्रार्थना करणाऱ्यांचे इंस्टावर मानले आभार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 29, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Urmila Nimbalkar
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आसाम-मिझोराम सीमेवर झालेल्या गोळीबार व दगडफेकीत आपले कित्येक जवान शहिद झाले. तर अनेक गंभीर जखमी झाले. त्यातील महाराष्ट्रीयन आयपीएस जवान वैभव निंबाळकर यांना मुंबईत आणण्यात आले आहे. आयपीएस जवान वैभव निंबाळकर हे मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिचे बंधू आहेत. वैभव यांना गोळी लागल्याचे ऐकून त्यांच्या पूर्ण कुटुंबाला जणू धक्काच बसला होता. दरम्यान सोशल मीडियावर अनेको लोकांनी त्यांच्या सुदृढ तब्येतीसाठी प्रार्थना केली होती. तर वैभव निंबाळकर आता सुखरूप आहेत. त्यामुळे यासर्व प्रकारातून आता कुठे हे कुटुंब सावरू लागले आहे. तर उर्मिलाने आपल्या भावासाठी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येक भारतवासियांचे आभार मानत एक असत सोशल मीडियावर शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Urmila| Actor Marathi Youtuber (@urmilanimbalkar)

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, सगळे उत्तम चालू असताना सकारात्मक राहणे, प्रार्थना म्हणणे वेगळे आणि ‘वैभवला गोळी लागलीय’ हे वाक्य ऐकायला मिळाल्यानंतर, ‘सगळं नीट होणार’ हा विचार मनात येणं वेगळं! काय झालं, कुठुन झालं, कोणत्या मशिन गननं झालं सगळं दिड दिवसांत एवढ्यावेळा कानावर आलंय पण खरं सांगु, मला आणि माझ्या घरच्यांना फक्त तो सुखरुप असावा, एवढीच आशा लागून राहिली होती. त्यात माझे प्रेग्नन्सीचे ९ महिने पु्र्ण झाल्यामुळे आता कधीही हॉस्पिटल गाठावं लागणार असल्यामुळे, मला ही बातमी सगळ्यात शेवटी सांगण्यात आली.

View this post on Instagram

A post shared by Urmila| Actor Marathi Youtuber (@urmilanimbalkar)

पुढे, बाळांनाही आपण पॅनिक झालेलो कळतो आणि तेही मग पॅनिक होतात. सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण विश्वासाने आम्ही भरपूर प्रार्थना म्हणालो. यशस्वी शस्त्रक्रिया पार पडून आयपीएस जवान वैभव आता अगदी सुखरुप आहे. किती आणि कुणाकुणाची कृतज्ञता व्यक्त करु? माझा भाऊ वैभवला आसाम-मिझोराम सिमेवर गोळी लागल्यानंतर, त्याची सुखरुप सर्जरी होऊन त्याला आराम लाभेपर्यंत पावलो पावली सद्गुरु रुपात अनेक माणसे मदतीसाठी धावली!

View this post on Instagram

A post shared by Urmila| Actor Marathi Youtuber (@urmilanimbalkar)

एअर फोर्सच्या स्पेशल एअर ॲम्ब्युलन्सने त्याला मुंबईला आणण्यापासून ते, आसाम पोलिस, आसाम सरकार, मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकार, कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलचा संपुर्ण स्टाफ, डॉक्टारांची फौज, आयपीएस वैभवचे सगळे अधिकारी-मित्र-बॅचमेटस्, वरिष्ठ अधिकारी, नामधारक, त्याच्या तब्ब्येतीसाठी प्रार्थना म्हणणारे तुम्ही सर्व..या संपुर्ण प्रक्रियेत माहित असलेले आणि नसलेले कित्तीतरी मदतीचे हात धावून आले. म्हणूनच मी आणि माझं संपुर्ण कुटुंब तुमचे आयुष्यभराचे ऋणी आहोत, असे उर्मिलाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Tags: Asam Mizoram BorderInstagram PostIPS Jawan Vaibhav NimbalkarUrmila Nimbalkar
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group