Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मन झालं बाजिंद’; झी मराठीच्या आगामी मालिकेतून बहरणार एक अनोखी प्रेमकथा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 30, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Man Zal Bajind
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील अनेक मालिका सध्या प्रेक्षकांचा निरोप घेण्याच्या मार्गावर असताना आता लवकरच काही नव्या मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. तर या नव्या मालिकांचे प्रोमो देखील झी मराठीने ऑफिशियल पेजवर शेअर केलेले आहेत. यातील ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेतून तरुण प्रेक्षक वर्ग ओढला जाणार असे दिसते आहे. या मालिकेचं नावातच अतोनात प्रेम आणि त्याचा रांगडा अंदाज बहरणार असे वाटत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या मालिकेचा प्रोमो पाहताच रसिकांची हुरहूर वाढली आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

आजवर आपण अनेक प्रेमकहाण्या मालिकांच्या स्वरूपात पहिल्या असतील. अश्या मालिकांमध्ये गुलाबी हवा, गुलाबी विश्व आणि प्रेमही गुलाबी अनुभवलं असेल पण पहिल्यांदाच ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण तुम्ही अनुभवू शकाल. परंपरागत व्यवसायाला आपल्या व्यवहार ज्ञानाने मोठा करणारा आणि माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा बाजिंदा नायक राया तर मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं उराशी बाळगणारी, संयमी, विचारी अशी नायिका कृष्णा यांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे.

View this post on Instagram

A post shared by Nirom मराठी (@nirom_marathi_official)

विशेष म्हणजे, पिवळा रंग बुद्धीचा, मांगल्याचा, समाधान आणि समृद्धीचा रंग आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पिवळ्या रंगाच्या हळदीला अतिशय मान असतो. कारण पिवळा रंग मन शुद्ध आणि पवित्र करतो. या पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी रंगणार, फुलणार आणि बहरणार आहे. तर या मालिकेतील राया आणि कृष्णा या मुख्य भूमिकेत अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे दिसणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केले आहे आणि वाघोबा प्रॉडक्शन यांनी या मालिकेची निर्मीती सूत्र सांभाळली आहेत.

Tags: Aniket SAneMan Zal BajindShweta Rajan Kharatupcoming New SerialVaibhav chavhanzee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group