हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा काल ४७वा वाढदिवस होता. या दरम्यान आपल्या लाडक्या अभिनेत्रीचा वाढदिवस म्हणून चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले होते. दरम्यान काजोलचे काही चाहते तिच्या वाढदिवशी थेट केक घेऊन तिच्या घराबाहेरच पोहोचले. पण काजोलचा भलताच अॅटिट्यूड पाहून मात्र इतर चाहत्यांची आणि विशेष करून युजर्सची भयंकर निराशा झाली. तिच्या बर्थ दे एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. या दरम्यान व्हिडीओतील तिचे वागणे पाहून मात्र नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चांगलाच जाळ काढला.
दरम्यान, काही फॅन्स केक घेऊन काजोलच्या घराबाहेर पोहोचले होते. या प्रसंगी व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने व्हिडीओ शूट केला आणि नेहमीप्रमाणे त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. तिचे चाहते केक घेऊन घराबाहेर पोहोचताच काजोल केक कापण्यासाठी घराबाहेर आली. काही फॅन्सने केक तिच्यापुढे केला. पण काजोलने मात्र दूरूनच जीवावर आल्यासारखे अगदीच कसाबसा तो केक कापला आणि काही सेकंदातच ती घरात निघून गेली. काजोलचा हा अॅटिट्यूट अनेक लोकांना आवडला नाही. याबाबत अनेकांनी सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
एका युजरने संतापात म्हटले कि, ज्या लोकांच्या प्रेमामुळे हे लोक मोठे होतात, त्यांनाच अॅटिट्यूड दाखवतात. तर अन्य एकाने म्हटले कि, लोक यांना इतका भाव का देतात माहित नाही? भाव देणे बंद करा, आपोआप जमिनीवर येतील. काश, इथे डिसलाईकचे बटण असते. हा अॅटिट्यूड जरा जास्तच झाला, अशी संतप्त प्रतिक्रिया आणखी एका युजरने दिली आहे. तर, अॅक्टिंग अशी जणू उपकार करतेय. रिअल लाईफमध्येही किती अॅक्टिंग करतात हे लोक, अशी भावना एका युजरने व्यक्त केली. घमंडी बाई, ही चाहत्यांच्या प्रेमाच्या लायकीचीच नाही. यांच्यापेक्षा गरिब, अनाथ मुलांचे वाढदिवस साजरे करा, अशा शब्दांत एका युजरने चांगलाच राग व्यक्त केला.
काजोल एकेकाळची अत्यंत आघाडीवर असणारी आणि भरपूर मोठा चाहता वर्ग असणारी बॉलिवूड अभिनेत्री आहे. साधारण ९०च्या काळात तिने अनेकांना आपल्या सौंदर्याने भूल पडली होती. त्यामुळे आजही तिचे असंख्य चाहते आहेत. सोशल मीडियावरही तिचे ११.५ मिलियन इतके जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. तिच्यासाठी आजही अनेको लोक वेडे आहेत. तिच्यावर प्रेम करणारे चाहते तिच्या वाढदिवसाचा दिवस अगदी उत्सव किंवा सोहळ्याप्रमाणे साजरा करत असतात. पण सध्या तिचे हेच चाहते भयंकर नाराज झाले आहेत.
Discussion about this post