हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल OTT प्लॅटफॉर्मचा नवा ट्रेंड सुरु आहे. ज्यावर मोठ्या प्रमाणात तरुणाई ऍक्टिव्ह दिसत आहे. विशेष करून TVFच्या अर्थात ‘द व्हायरल फीवर’वरील सर्व वेबसीरीज तरुणांसाठी बनवल्या आहेत. यात अगदी प्रेम, अभ्यास, वाद, करिअर, मैत्री, त्रास, कुटुंब अशा सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत. ज्यात आजचा तरुण वर्ग गुंतलेला आहे, या सर्व गोष्टी या वेब सीरीजमध्ये दाखवल्या आहेत. चला तर, आज आम्ही तुम्हाला TVFच्या अशाच काही निवडक वेब सीरीज बद्दल सांगणार आहोत, ज्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
१) ट्रिपलिंग – या सीरीजचे २ भाग असून यात सुमीत व्यास, मानवी गग्रू आणि अमोल पराशर दिसले होते. ही मालिका चंदन, चंचल आणि चितवन या तीन भावंडांवर आधारित आहे, जे रोड ट्रिपला जातात. यात विनोद, भावना, कौटुंबिक कलह, सर्व काही पाहायला मिळेल. समीर सक्सेना दिग्दर्शित या सीरीजला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.
२) पर्मनंन्ट रूममेट्स – प्रेम करणे आणि टिकविणे यात खूप फरक आहे. एखाद्या व्यक्तीसोबत आयुष्यभर राहणे वाटते तितके सोपे नसते. या सीरीजमध्ये सुमित व्यास आणि निधी सिंह मुख्य भूमिकेत आहेत. दोघांची केमिस्ट्री सुंदर आहे. यात रोमान्स, इमोशन्स आणि भांडणे प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. या सीरीजचे २ भाग २०१४ आणि २०१६ मध्ये आले आहेत.
३) गुल्लक – ही एक मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा आहे, ही पाहून प्रत्येकाला हे माझ्या कुटुंबात घडतेय असे भासेल. यात जमील खान, गीतांजली कुलकर्णी, वैभव राज गुप्ता आणि हर्ष मायर यांच्या मुख्य भूमिका आहेत. टीव्हीएफच्या या सीरीजमध्ये तुम्हाला हसू आणि आसू दोन्ही आवरता येणार नाहीत.
४) कोटा फॅक्टरी – कोटा फॅक्टरी २०१९ मध्ये रिलीज झाली होती. यात मयूर मोरे, रंजन राज, आलम खान, जितेंद्र कुमार, रेवती पिल्ले आणि एहसास चन्ना यांच्या भूमिका आहेत. राघव सुब्बू दिग्दर्शित, ही सीरीज कोटा येथे अभ्यासासाठी येणाऱ्या मुलांच्या जीवनाचे चित्रण करते. यात अभ्यासाबद्दलचा ताण असणाऱ्या मुलांच्या आयुष्याची कथा दाखविली आहे.
Discussion about this post