हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे चांगलाच अडचणीत आला असून तो अद्यापही तुरूंगातच आहे. या प्रकरणामुळे शिल्पा शेट्टी आधीच वादाच्या भोव-यात आहे आणि शिवाय तिच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. यात आता आणखी एका प्रकरणामुळे ती चांगलीच गोत्यात येणार असे दिसत आहे. शिल्पा आणि तिची आई सुनंदा शेट्टी या दोघींवरही कथितरित्या आर्थिक फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. स्लिमिंग स्किन सलून व स्पा सुरू करण्याच्या नावाखाली त्यांनी लखनऊमधील व्यावसायिकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी लखनऊतील हसरतगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लखनऊ पोलिसांची एक टीम या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सध्या मुंबईत दाखल झाली आहे. यामुळे शिल्पा शेट्टीला आणि तिची आई सुनंदा शेट्टी या दोघीनाही अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अमर उजाला वृत्त माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार, शिल्पाने आयोसिस नावाची स्लिमिंग स्किन सलून व स्पा अशी एक कंपनी सुरू केली होती. शिल्पा या कंपनीची चेअरमन आहे. तर तिची आई या कंपनीची डायरेक्टर आहे. याच कंपनीवर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कंपनीची एक ब्रांच लखनऊमध्ये सुरू करण्यात येणार होती. दरम्यान फ्रेंचाइजी देण्याच्या नावावर शिल्पा व तिच्या आईने कोट्यवधी रूपये घेतले पण, फ्रेंचाइजी मात्र दिली नाही. व्यावसायिक ज्योत्स्ना चौहान आणि रोहित वीर सिंह यांनी शिल्पा व सुनंदा यांच्या विरोधात आर्थिक फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.
शिल्पा की किरकिरी: चारों तरफ से मुसीबत में फंसी अभिनेत्री, पति के बाद अब मां और खुद की गिरफ्तारी की आई नौबत@TheShilpaShetty @TheRajKundra #SunandaShetty @ShamitaShettyhttps://t.co/epohu3RxcN
— Amar Ujala (@AmarUjalaNews) August 9, 2021
अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा व तिची आई सुनंदा शेट्टी त्यांना हे स्पा सुरू करण्यासाठी जागा आणि इतरत्र साहित्य पुरवणार होती. दरम्यान एकदा नव्हे तर दोनवेळा सुमारे अडीच कोटी रूपये वसूल केल्यानंतरही कंपनीकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महिनाभरापूर्वी लखनऊ पोलिसांनी याप्रकरणी सुनंदा शेट्टी यांना नोटीस पाठवलेली होती. मात्र नोटीस मिळूनही त्यांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. परिणामी आता पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात नोटीस जारी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर यावेळी लखनऊ पोलिसांची एक टीम थेट मुंबईत येऊन धडकली आहे त्यामुळे आता शिल्पा आणि तिच्या आईच्या अडचणी दुप्पटीने वाढणार ह्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
Discussion about this post