हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या कोविड महामारीमुळे जगभरातील चित्रपटगृहे, सिनेमा थिएटर अद्यापही टाळेबंद दिसत आहेत. या दरम्यान मात्र रंगकर्मींना आपल्या पोटापाण्यासाठी सरकारने कोणतीही इतर व्यवस्था करून न दिल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी रंगकर्मींनी हक्कासाठी आवाज उठविला आहे. आम्हाला काही नको आमच्या रंगमंचाचा पडदा उघडा इतकीच माफक अपेक्षा करीत रंगकर्मींनी विविध जिल्ह्यात मूक आंदोलन आणि सौम्य आंदोलन केल्याचे दिसले. या दरम्यान आता रंगकर्मींसाठी रंगकर्मी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार अशी मोठी घोषणा सांस्कृतिक कार्य विभागातर्फे करण्यात आली आहे.
#महाराष्ट्रातील विविध #कलाक्षेत्रातील सर्व #रंगकर्मींसाठी कल्याणकारी मंडळ लवकरच स्थापन करण्यासाठी #सांस्कृतिक #कार्य विभाग पुढाकार घेईल अशी भूमिका आज रंगकर्मींशी मंत्रालयात संवाद साधताना मांडली.@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks@bb_thorat @NANA_PATOLE pic.twitter.com/lcgqyNOQK1
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) August 10, 2021
रंगकर्मींचा रंगकर्मी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे, यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केली. राज्यातील विविध कला क्षेत्रातील रंगकर्मींशी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मंत्रालयात संवाद साधला. या दरम्यान सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रात वेगवेगळ्या कलाक्षेत्रात अनेक कलाकार काम करीत आहे. या सर्व रंगकर्मीसाठी हे कल्याणकारी मंडळ काम करणार असून हे मंडळ लवकर स्थापन होण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील आहे.
पुढे म्हणाले, राज्यातील कलाकारांची नोंदणी करण्याचे काम जिल्हास्तरावर करण्यात येत असले तरी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ऑनलाईन कलाकार नोंदणी कशी सुरु करता येईल याबाबत प्रयत्न करावेत. दरम्यान राज्यात रंगकर्मींचा आंदोलनाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. यासाठी अनेको कलाकारांनीही पुढाकार घेतला आहे. यात रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र या संस्थेतर्फे काही कायमस्वरुपी मागण्या करीत असलेले पत्रक देशमुख यांना देण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील रंगकर्मीची नोंद होणे, कलाकार पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अटींमध्ये शिथिलता आणणे, असंघटित रंगकर्मीसाठी रंगकर्मी बोर्ड स्थापन करणे, वयोवृध्द रंगकर्मीसाठी शासकीय आणि खाजगी वृध्दाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी, एकपात्री किंवा दोनपात्री कलाकारांना कला सादर करण्याची परवानगी, अटी व नियमांचे पालन करुन रंगकर्मींना कला सादर करण्याची परवानगी द्यावी अशा मागण्या रंगकर्मीनी या पत्रकातून केल्या आहेत.
Discussion about this post