हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नशीब अशी गोष्ट आहे जी दिसत नाही पण पलटली तर होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याकडे सारं काही येऊ शकतं. त्यामुळे नशिबाचा खेळ साधा सोप्पं सरळ नाही. हे असंच काही घडलं ते रानू मंडलच्या बाबतीत. काही सेकंदाच्या एका वायरल व्हिडीओमूळे रानू मंडलचे अख्खे आयुष्य बदलले. बघता बघता ती रातोरात लोकप्रिय झाली. ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गाऊन लोकप्रिय झालेली रानू मंडल आली फेमस झाली आणि पुन्हा अचानक गायबसुद्धा झाली होती. त्यानंतर ती कुठेय ? काय करते असा प्रश्न अनेकांना पडला होता. यानंतर तिचा एक नवा व्हिडीओ वायरल होतोय मात्र यावेळी कौतुकापेक्षा जास्त लोक खिल्ली उडवण्यात व्यस्त आहेत.
https://www.instagram.com/p/CSiybljoxd-/?utm_source=ig_web_copy_link
छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात राहणाऱ्या सहदेवच्या वायरल ‘बचपन का प्यार’ या गाण्याच्या व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की तो एक सोशल मीडिया सेन्सेशन बनला. मग काय बॉलिवूड जगतातील लोकप्रिय रॅपर बादशाहने सहदेवसोबत ‘बचपन का प्यार’ हे गाणं रेकॉर्ड केलं आणि प्रदर्शितही केलं. यानंतर या गाण्याने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. परंतु विशेष सांगायचे म्हणजे यानंतर आता रानू मंडलने ‘बचपन का प्यार’ हे गाणं गायलं असतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी ट्रॉलिंग सुरु केलं आहे.
सेकर्ड अड्डा नामक एका इंस्टाग्राम पेजवर रानू मंडलचा हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये रानू मंडल ‘बचपन का प्यार’ हे गाणं गाताना दिसत आहे. तर एक व्यक्ती ते रेकॉर्ड करताना दिसतेय. रानू मंडलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. मात्र यानंतर अनेक नेटकऱ्यांकडून अनेक विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी तिचं हे गाणं अधिकच पसंत केलं आहे. तर काहींनी तिच्या गाण्यावरुन ट्रोलही केलं आहे. यातील एका युजरने म्हटले तू अजून जिवंत आहेस.. तर अन्य एकाने म्हटले बेसुर आवाज. एका युजरने गाण्याच्या बोलांचे संदर्भ साधत अपनी औकात भुल नही जाना रे घमंड मत कभी लाना रे वरना यही हाल होगा रे, असे म्हणत रानू मंडलला ट्रोल केले आहे.
Discussion about this post