हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याचा ‘बेलबॉटम’ हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तसे पाहता या चित्रपटाला हवा तितका प्रतिसाद मिळत नसला तरी तात्पुरती मनाची समजूत करण्याइतका प्रतिसाद नक्कीच आहे. मात्र समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. परंतु अजूनही कोविड नियमांमुळे अनेक चित्रपटगृहांमध्ये अनेको प्रेक्षक जाऊ शकत नाहीत. आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाईल, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना या चित्रपटासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. येत्या एका महिन्यात ओटीटीवर आपण चित्रपट पाहू शकता.
अहवालानुसार, बेलबॉटम हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होईल. सूत्रांनुसार, हा चित्रपट थिएटर रिलीजनंतर २८ दिवसांनी ओटीटीवर उपलब्ध होणार होता. मुख्य म्हणजे, कोणत्याही चित्रपटाला ८ आठवड्यांनंतर ओटीटी रिलीज करण्याची परवानगी दिली जाते. मात्र बेलबॉटमसाठी ४ आठवड्यांनंतरची परवानगी मिळाली आहे. “खरं तर, बेलबॉटमचे निर्माते वासू भगनानी यांना चित्रपटाच्या थिएटर रिलीजनंतर २ आठवड्यांनी ओटीटीवर प्रीमियर करायचा होता.
पण यानंतर राष्ट्रीय मल्टिप्लेक्स साखळीने थिएटर रिलीजसह एक अट घातली. त्यानंतर त्यांनी ४ आठवड्यांनंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यास सहमती दर्शविली. मिळालेल्या माहितीनुसार, बेलबॉटमच्या निर्मात्यांनी हा चित्रपट तब्बल ७५ कोटीत विकला आहे. दरम्यान रिलीजनंतर या चित्रपटाने दोन दिवसात सुमारे ५ कोटी कमावले आहेत. चित्रपटाने पहिल्याच दिवशी २.७५ कोटी आणि दुसऱ्या दिवशी सुमारे २.४० कोटी कमावले आहेत.
या चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी हे कलाकार झळकत आहेत. हा चित्रपट भारतात एकूण १६२० स्क्रीनवर रिलीज झाला असून परदेशात सुमारे २२५ स्क्रीनवर रिलीज झाला आहे. याशिवाय परदेशी बाजारात बेलबॉटमने उत्तर अमेरिकेतून २०.१८ लाख कमविले आहेत. याआधी हा चित्रपट सौदी अरेबिया, कुवैत आणि कतारमध्ये प्रदर्शित करण्यास बंदी घालण्यात आली होती. या बंदीमागील कारण असे सांगण्यात आले होते, की बेलबॉटम या चित्रपटात दुबईहून लाहोरला विमान अपहरण केले जाते असा प्रसंग दाखवण्यात आला आहे. यामुळे सौदी अरेबियालाच्या मतानुसार त्यांना असे वाटते की त्यांच्या देशाची प्रतिमा यामुळे खराब होत आहे.
Discussion about this post