हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या दोन दिवसांपासून बजरंगी भाईजानचा दिग्दर्शक कबीर खान चांगलाच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे त्याने एका वृत्त माध्यमाशी बोलताना केलेले वक्तव्य त्याला चांगलेच भोवले आहे. मुघलांचा इतिहास तपासून चित्रण करावे आणि मुघलांचे राक्षसी चित्रण पाहवत नाही असे म्हणत मुघल खरे राष्ट्रनिर्माते होते असे वक्तव्य केल्यामुळे विविध स्तरांवर विविध प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान अनेक नेटकऱ्यांनी आपला संताप ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. यावेळी काही नेटकाऱ्यानी कबीरचे आगामी चित्रपट बॉयकॉट करा असे म्हटले आहे. त्यामुळे कबीर खान दिग्दर्शित अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण स्टारर बहुप्रतिक्षित चित्रपट ’83’ च्या रिलीजबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत कबीर खान यांनी आपली बाजू मांडली आहे.
बॉलिवूडचा आगामी चित्रपट ’83’ यामध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर याशिवाय दीपिका पदुकोण चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच हे दोघे एकत्र दिसणार आहेत. बऱ्याच काळापासून लॉकडाऊनमूळे चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना अपेक्षा आहे त्याहून कमी यश घेऊन समाधान मानावे लागत आहे. अशा परिस्थितीत, ’83’ चित्रपटासाठी, चाहते अनुमान लावत होते की आता चित्रपटगृहे सुरु झाली आहेत, रणवीरचा चित्रपटही लवकरच दिसेल.
पण याबाबत बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, जोपर्यंत देशभरातील प्रत्येकाला लसीकरण होत नाही आणि 100 टक्के चित्रपटगृहे सुरु होत नाहीत, तोपर्यंत प्रेक्षकांना थोडी प्रतिक्षा करावी लागेल.क्रिकेटवर बनलेला हा चित्रपट 4 जून 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी इन्स्टाग्रामद्वारे चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांनी लिहिले की चित्रपटगृहांमध्ये आपणा सर्वांना भेटू पण महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी न मिळाल्याने ही तारीख पुढे ढकलण्यात आली. याचे कारण सांगितले जाते की या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन अपेक्षेइतके मिळत नाही. कारण खूप कमी लोक चित्रपट पहायला जात आहेत. निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत आणि असे म्हटले जात आहे की रणवीरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसला मालामाल करू शकतो. जे सध्याच्या परिस्थितीत निर्मात्यांना रिलीज करण्याचा धोका असल्याचे दिसते.
Discussion about this post