Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘अत्याचारी मुघलांचे कौतुक केलेले विधान त्वरित मागे घ्या’; दिग्दर्शक कबीर खानला राम कदम यांचा इशारा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 27, 2021
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या दोन दिवसांपासून ‘मुघल हेच खरे राष्ट्रनिर्माते होते’ हे वक्तव्य करणारा बॉलिवूड चित्रपटांचा दिग्दर्शक कबीर खान चांगलाच चर्चेत आहे. हे वक्तव्य कबिरच्या चांगलेच अंगलट आले असून याचे पडसाद सामान्य जनतेपासून राजकीय नेते मंडळींकडून उमटल्याचे दिसून येत आहे. हा वाद न संपणारा आहे असेच दिसत आहे. कारण यात आता भाजप आमदार राम कदम यांनी आपली भूमिका दर्शविली आहे. अत्याचारी मुगलांचे कौतुक करणारे विधान कबीर खानने त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी राम कदम यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत केली आहे. हि मागणी एक प्रकारचा इशाराच आहे असे म्हणायला देखील हरकत नाही. कारण ‘द एम्पायर’ या हॉटस्टारवर प्रदर्शित होऊ घातलेल्या वेबसीरिजवर बंदी घालायला हवी, असे देखील कदम यांनी म्हटले आहे. शिवाय ही सीरिज अत्याचारी मुघल बादशहाचे कौतुक करणारी असल्याचे त्यांनी या व्हिडिओत सांगितले.

#TheEmpire नावाच्या वेबसिरीज #hotstar वर येत आहे. जे अत्याचारी मुघल बादशहाचे कौतुक करणारी आहे, या वेबसिरीजवर त्वरित बंदी घालायला हवी!

आणि दिग्दर्शक कबीर खानने अत्याचारी मुगलबादशाह बद्दल कौतुकाने केलेले विधान त्वरित मागे घ्यावे! – राम कदम pic.twitter.com/gtR9f8cn1C

— Ram Kadam (@ramkadam) August 27, 2021

भाजप नेते राम कदम यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करताना दिग्दर्शक कबीर खानवर जोरदार टीका केल्या आहेत. इतकेच नव्हे तर, ‘द एम्पायर’ या आगामी सिरीजवर बंदी घालण्याची मागणीदेखील केली आहे. यात ते म्हणाले कि, ‘ द एम्पायर नावाची वेब सीरीज हॉटस्टार वर येते आहे. ज्या मुघल बादशाहांनी आपल्या देशावर आक्रमण केलं. रक्तपात करत लूटमार केली, लोकांवर अत्याचार करत त्यांचे छळ केले. मंदिरं तोडली, धर्मशाळांचा विद्ध्वंस केला, अश्या त्या मुघलांचा जयजयकार आणि प्रशंसा या वेब सीरीजमध्ये केली आहे. बाबरपासून औरंगजेबापर्यंत जे मुघल बादशाह भारतात येतात, भारताची लूट करतात, त्यांचं कौतुक या भूमीत कसं होऊ शकतं? आमचा या वेब सीरीजला विरोध आहे. याच्यावर कायमची बंदी घालण्यात हवी. तर दुस-या ठिकाणी दिग्दर्शक कबीर खान असं म्हणतात की, मुघलांचा भारताच्या निर्मितीत, देशहितामध्ये फार मोठा वाटा आहे. ज्या लोकांनी भारतात लूट केली, त्यांचा भारताच्या निर्मितीत वाटा? हे विधान न पटणारं आहे. कोणाला चित्रपट-मालिका बनवायची असेल, तर आमच्या शिवरायांवर बनवा, राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रतापसिंग यांच्यावर बनवा. पण अशा प्रकारचं विधान आम्हाला मान्य नाही. हे विधान त्वरित मागे घ्यावे.

"It's the easiest thing today, demonising the Mughals and various other Muslim rulers that India had at different points in its history," says filmmaker #KabirKhan.https://t.co/9ISK2n8AfW

— Filmfare (@filmfare) August 25, 2021

त्याच झालं असं कि, दिग्दर्शक कबीर खान याने एका माध्यमाशी बोलताना म्हटले होते कि, एखाद्या चित्रपट निर्मात्याने संशोधन केलेले असते किंवा चित्रपट निर्मात्याला एखादा मुद्दा मांडायचा असतो तेव्हा मी समजू शकतो. पण मग तुम्हाला मुघलांना कोणत्याही दृष्टीने खलनायक म्हणूनच प्रेक्षकांसमोर सादर करायचे असेल तर त्यासाठी आधी काही विशेष संशोधन करा आणि मग ते खलनायक होते हे सर्वांना पटवून द्या. खरंतर, मुघल राज्यकर्ते हे मूळ राष्ट्रनिर्माते होते. पण त्यांनी खून केले, त्यांनी जनतेचा छळ केला असे म्हणणे किंवा त्या आधारावर त्यांचा इतिहास रचून लिहिणे यासाठी कोणता आधार घेत आहात. या सर्व लिखाणासाठी कोणतेतरी ऐतिहासिक पुरावे पहा.

Producer Director,Kabir khan told that Mughals were real nation builders. They demolished Temples,converted Hindu into muslims and you say they were nation builders. Teach him some lessons and BOYCOTT his films @producers_guild @PMOIndia

— C.S.Richhariya (@c_richhariya) August 26, 2021

इतिहासकारांसोबत विविध प्रश्नांवर खुली चर्चा करा. पण केवळ लोकप्रियता मिळविण्यासाठी असे काहीही करू नका. भारताच्या इतिहासात वेगवेगळ्या कालावधीत होऊन गेलेल्या मुघल आणि इतर मुस्लीम शासकांना कमी लेखण्याचं काम आज फार सोप्प आहे. मला असं कथानक असणाया चित्रपटांबद्दल आदर वाटत नाही. अर्थात हे माझं स्वत:चं वैयक्तिक मत आहे. या वक्तव्यानंतर कबीर खानवर नेटकऱ्यांनीही संतापाचे ताशेरे ओढल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

Tags: BJP LeaderBollywood Film DirectorControvercyKabir KhanRam Kadam
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group