हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। माधुरी दीक्षित हे असे नाव आहे जे कित्येकांच्या मनमानावर कोरलेले आहे. कारण गेल्या कित्येक काळापासून ना माधुरीच्या अदा बदलल्या, ना तिचे मोहक सौंदर्य आणि ना तिचे भुरळ घालणारे हास्य. शिवाय आपल्या डान्स आणि अभिनयाने तिने अगदी लहानापासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींवर जणू जादूच केली आहे. आज जवळ जवळ पन्नाशीच्या वयात येऊनसुद्धा माधुरी तितकीच उत्साही दिसते. त्यामुळे तिचा चाहतावर्ग देखील अद्याप सक्रिय आणि तितकाच उत्साही आहे. त्यात माधुरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तसेच ती विविध कार्यक्रमातसुद्द्धा सहभागी होताना दिसते.
नुकताच माधुरीने एका मराठी कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती दर्शविली होती. यामुळे तिचे चाहते खूपच खुश आहेत. मुख्य म्हणजे या कार्यक्रमादरम्यान तिने एक मस्त मराठी उखाणा घेतला आहे. यासोबत एक गुपीतही सांगितले आहे.
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितला सर्व स्तरावर ओळखलं जातं. गेली कित्येक वर्ष आपल्या दमदार अभिनयासह मोहक अदाकारीने माधुरीने सर्वांना घायाळ केलं आहे. माधुरीच्या स्माईलचे आजही लाखो लोक दिवाने आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करणारी ही अभिनेत्री भले हिंदी चित्रपटात आघाडीवर असेल मात्र ती मूळ अस्सल महाराष्ट्रीयन आहे.
हि बाब जवळ जवळ तिच्या सगळ्याच चाहत्यांना ठाऊक आहे. मुख्य म्हणजे माधुरी जरी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असली, तरी ती एक मराठमोळी मुलगी आहे आणि याचा बाणा तिने नेहमीच मिरवला आहे. त्यामुळे तिचं मराठीवर विशेष प्रेम आहे, यात काहीच वाद नाही. यामुळे ती मराठी कार्यक्रमांना उत्साहाने उपस्थित राहते.
नुकतीच माधुरी प्लॅनेट मराठीच्या एका मराठी कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. यावेळी ती खुपच आनंदी, उत्साही आणि नेहमीप्रमाणे तेजस्वी दिसत होती. यावेळी तिने एक गुपित सांगत आपल्या चाहत्यांना जणू सुखद धक्काच दिला आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली, की ती मराठी कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे, हे ऐकून तिची आई जाम खुश झाली होती. माधुरीने हे सांगताचं सर्वांनाचं तीच मोठं कौतुक वाटलं. तसेच आपल्या मायबोलीवर माधुरी आणि तिच्या आईचं असलेलं प्रेम पाहून सर्वांना आनंद झाला. इतकचं नव्हे तर यावेळी माधुरीने एक खास उखाणादेखील घेतला आहे.हा उखाणा घेण्यासाठी माधुरीला मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीनं विशेष मदत केली. ‘आतापर्यंत सगळे चित्रपट केले बॉलिवूडसाठी, आता माझे माहेर फक्त प्लॅनेट मराठी’, असा उखाणा घेऊन माधुरीने टाळ्या मिळविल्या आणि यानंतर पुष्करचे आभारदेखील मानले. एकंदरीत या कार्यक्रमामध्ये माधुरीचा उत्साह आणि मातृभाषेवरील प्रेम पाहून मराठी चाहता वर्ग जाम खुश झाला आहे.
Discussion about this post