Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मूक – कर्णबधीर समुदायासाठी रणवीर सिंगचा पुढाकार; तरुणाईला केले हे आवाहन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 24, 2021
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा फंकी हिरो अर्थात झॅक पॅक रणवीर म्हणजेच बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमीच त्याच्या युनिक पेहरावांमुळे चर्चेत असतो. मात्र आजकाल तो चर्चेत असण्याचे कारण थोडे वेगळेच आहे. तो सातत्याने मूक कर्णबधिर समुदायाच्या समस्यांचा वाचा फोडण्याचं काम करत आहे. तर भारतीय सांकेतिक भाषेला (आयएसएल) भारताच्या २३’व्या अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा, यासाठीही त्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नुकतीच त्याने या मुद्यावर जागरुकता निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. शिवाय रणवीर सिंगने नवझार इराणीसोबत IncInk हे स्वतंत्र रेकॉर्ड लेबल तयार केले आहे. तर यावर सांकेतिक भाषेतील म्युझिक व्हिडिओ रिलीज केले आहेत. तसेच भारतीय सांकेतिक भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी रणवीर प्रयत्न करत आहे. यासाठी भारतीय कर्णबधिर समुदायाने त्याचे कौतुक करीत त्याचे आभार व्यक्त करणारा व्हिडिओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

 

आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनाचे औचित्य साधून रणवीरने कर्णबधिर समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचे तडफदार आवाहन तरूणाईला केले आहे. तसेच ‘गेल्या दीड वर्षात कोरोना महामारीमूळे आपण जे काही भोगलं, त्यानंतर आपल्यासाठी बहुमूल्य आणि जपण्यासारखी एखादी गोष्ट असेल तर, ती म्हणजे समाजाची शक्ती आणि एकमेकांचा सहवास. आजच्या तरुणाईला माझे एक सांगणे आहे की, त्यांनी त्यांचे काम करत राहिले पाहिजे आणि ते करताना त्यांनी कर्णबधीर समुदायाला आपल्यात सामावून घेतलं पाहिजे. आपण एकत्रितपणे हा बदल घडवून आणू शकतो, आजच्या काळातल्या तरुणाईवर माझा विश्वास आहे,’ असे म्हणत रणवीरने तरुणाईला या लढ्यात सामावून घेत आवाहन केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

इतकेच नव्हे तर पुढे तो म्हणाला, IncInk मध्ये आम्ही कलेचे सृजन करतो. आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनी रिलीज झालेल्या आयएसएल व्हिडिओत अनेक नव्या संकल्पना आहेत. आम्ही कर्णबधीर समुदायाशी संवादात्मक पध्दतींनी नातेसंबंध वाढवू शकतो, हे सर्व अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. भारतीय सांकेतिक भाषेला भारतातल्या २३’व्या अधिकृत भाषेचा दर्जा दिला जावा, ही कर्णबधिर समुदायाची मागणी आहे. ही मागणी पुढे रेटणे आपले कर्तव्य आहे. मला आपल्या देशातील नेत्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ही मागणी मान्य होईल, अशी आशा आहे. मी नागरिकांना सुद्धा संबंधित याचिकेवर स्वाक्षरी करण्याची विनंती करतो.

Tags: bollywood actorInclnkInternational Sign Language DayRanveer Sing
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group