हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याचा कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ सध्या एका वादात सापडला आहे. हा वाद इतका मोठा झाला आहे कि या शो विरोधात चक्क FIR दाखल करण्यात आली आहे. मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्हा न्यायालयात या शो विरोधात हि FIR दाखल झाली आहे. याचे कारण म्हणजे शोच्या एका एपिसोडमधील दृश्यावर आक्षेप नोंदवत एका वकीलानेच थेट कोर्टात धडक मारली आहे. या प्रकरणावर येत्या १ ऑक्टोबर २०२१ रोजी सुनावणी होणार आहे. परंतु या सर्व दरम्यान ‘द कपिल शर्मा शो’च्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
त्याचे झाले असे कि, शिवपुरीच्या एका वकीलाने ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शो विरोधात FIR दाखल करण्याची मागणी करत याचिका दाखल केली आहे. मालिका विश्वातील लोकप्रिय वाहिनी सोनी टीव्हीवर प्रसारित होणा-या ‘द कपिल शर्मा शो’च्या १९ जानेवारी २०२० रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये कोर्टरूमचा सीन दाखवला होता. यामध्ये कलाकारांना दारू पिताना दाखवले आहे. हा न्यायव्यवस्थेचा अपमान असल्याचा दावा, याचिकाकर्त्याने केला आहे. तर हा एपिसोड अलीकडे २४ एप्रिल २०२१ रोजी रिटेलिकास्ट करण्यात आला होता.
या एपिसोडमध्ये कलाकार मद्यधुंद अवस्थेत कोर्टरूमच्या सेटवर अभिनय करताना दाखवणे चूक आहे. हा न्यायदेवतेचा अपमान आहे. शोमध्ये महिलांवर अश्लिल कमेंट केल्या जातात. कोर्टरूमचा सेट उभारून अपमानास्पद विनोद केले जातात. हे सर्व गैर आहे. यामुळे आपण कोर्टात कलम 356/3 अंतर्गत दोषींवर FIR नोंदवण्याची मागणी केली आहे. विनोदाच्या नावावर असला विभत्स प्रकार थांबला पाहिजे, असे याचिकाकर्त्याने सांगितले आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिल शर्मासोबत भारती सिंग, कृष्णा अभिषेक, सुदेश लहरी, किकू शारदा, अर्चना सिंग असे कलाकार प्रेक्षकांना हसवताना दिसत आहेत. नुकतेच २१ आॅगस्ट २०२१ पासून या शोचा हा नवा सीझन सुरू झाला आहे आणि लगेचच एक नवा वाद उभा राहिल्याचे दिसत आहे.
Discussion about this post