हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनामुळे गेल्यावर्षभरात अनेको चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांची ढकल पाहायला मिळाली. यांपैकी एक चित्रपट म्हणजे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचा ८३. याचे कारण असे कि कोरोनाचा वाढत कहर पाहता चित्रपट गृहे बंद ठेवणे हा एकमेव पर्याय शासनाकडे होता. परिणामी राज्यातील एकूण एक चित्रपटगृहांना टाळे लावण्यात आले होते. मात्र आता कोरोनाची ओसरतो लाट एक आशेचा किरण घेऊन आला आहे. त्यामुळे आता रणवीरचा बहुप्रतीक्षित ८३ रिलीज होणार आहे हे ऐकून त्याचे चाहते खुश झाले आहेत. याबाबत अभिनेता रणवीर सिंगने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे आणि सोबत त्याने चित्रपटातील एक फोटोही शेअर केला आहे.
राज्यभरातील सर्व चित्रपटगृह येत्या २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ सप्टेंबर २०२१ रोजी केली. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात खऱ्या अर्थाने आनंदाचे वारे वाहू लागले आहेत. कारण बऱ्याच दिवसांपासून खोळंबलेली चित्रपटसृयष्टी पुन्हा एकदा सुरु होतेय. रखडलेल्या सगळ्या चित्रपटांच्या रिलीज डेट समोर येत आहेत. यात ‘८३’चादेखील समावेश आहे. “हीच वेळ आहे…’83’ यंदाच्या ख्रिसमसमध्ये चित्रपटगृहांमध्ये. हिंदू, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळममध्ये प्रदर्शित होणार आहे.#ThisIs83”, अशी पोस्ट शेअर करत रणवीरने चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या ख्रिसमसमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार हे नक्की.
कबीर खान यांनी दिग्दर्शित केलेल्या ८३ मध्ये पहिल्यांदाच अभिनेता रणीवर सिंगसह त्याची पत्नी आणि आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण स्क्रीन शेअर करणार आहे. दीपिका या चित्रपटात रणवीर भूषवित असलेल्या पात्राची अर्थात कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. माहितीनुसार, २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. या विजयगाथेवर आधारित कथानक ‘८३’ या चित्रपटात पहायला मिळेल. या चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
Discussion about this post