हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन प्रेक्षकांना चांगलाच भावतोय. इतकेच नव्हे तर जिथे तिथे बिग बॉस मराठीची भन्नाट चर्चा सुरु आहे. बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी सगळेच झटताना दिसत आहेत. टास्क, भांडण, वादविवाद, थोडी गोडी गुलाबी सगळं कसं टोटल टू टोटल. अशात आविष्कार दारव्हेकर आणि स्नेहा वाघ एकाचवेळी एकाच घरात व स्क्रीन म्हणजे मोठा विषय झाला आहे. याचे कारण असे कि, एकेकाळी आयुष्यभराची बांधलेली लग्नगाठ काही कारणांनी तुटली आणि वेगळे झालेले हे दोघेही पुन्हा अश्या पद्धतीने समोर आले आहेत कि, जाणून सहन हि होत नाही आणि सांगताही येत नाही. दरम्यान आविष्काराने सहस्पर्धक जयसोबत बोलताना काही गोष्टींचा खुलासा केला आहे.
अभिनेता अविष्कार दारव्हेकर आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अभिनेत्री स्नेहा वाघ दोघेही बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. एकत्र नांदत नसलेले बिग बॉसच्या घरात मात्र एकत्र नांदत आहेत. कधीकाळी स्रेहा व अविष्कार पती-पत्नी होते. आताश: दोघांचाही घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले. तर अलीकडेच एका एपिसोडमध्ये आविष्कार स्रेहासोबतचं लग्न व घटस्फोट याबाबत बोलताना दिसला. तो म्हणाला, ‘स्नेहा ही घरात स्पर्धक म्हणून येणार आहे हे मला माहिती नव्हते आणि मला माझ्या भूतकाळात परत जायची अजिबात इच्छा नाही. पण इतक्या वर्षांनी आम्ही दोघे एकत्र कसे राहतो, हे बिग बॉसला दाखवायचे असेल म्हणून कदाचित त्यांनी आम्हाला एकत्र आणले असावे.
पुढे, बिग बॉस मराठीने मला आयुष्यात दुसरी संधी दिली आहे आणि मी याची कदर करतो. स्रेहासोबतचा घटस्फोट माझ्या आयुष्यातील सगळ्यांत वाईट घटना होती. स्रेहाने माझ्यावर अनेक आरोप केले होते. या घटस्फोटानंतर मी खूप दारूच्या आहारी गेलो होतो. माझा अक्षरश: ‘कबीर सिंग’ झाला होता, ‘ असे आविष्कार जयला सांगताना दिसला. यावर जय आश्चर्यचकित होत म्हणाला, स्रेहा घरात खूप शांत आणि समजूदार वाटते. यावर आविष्कार म्हणतो, ती अजिबात शांत नाही. चांगलीच तापट आहे. वेळ आली की, तुलाही कळेल.
वयाच्या अवघ्या १९’व्या वर्षी स्रेहा आविष्कारने लग्नगाठ बांधली. मात्र काही वर्षातच ते वेगळे झाले. स्नेहाने आविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. या दरम्यान एका मुलाखतीतमध्ये स्नेहा म्हणाली होती कि, ‘ मी खूप काही सहन केलं. अखेर माझ्या आई-वडिलांच्या आणि बहिणीच्या मदतीने मी यातून बाहेर पडू शकले. पतीच्या मारहाणीला बळी पडून त्यातून बाहेर पडू न शकणा-या महिलांबद्दल मला खूप वाईट वाटतं.
Discussion about this post