Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BB मराठी 3 – एकीकडे शिवलीला घराबाहेर तर दुसरीकडे विशाल-अक्षयची जोरदार तू तू मैं मैं!

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 30, 2021
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या नव्याकोऱ्या सिजनचे आता २ आठवडे सरतीला आले आणि घरामध्ये एकापेक्षा एक टास्क आणि जंगी सामने पाहायला मिळत आहेत. सध्या या घरामध्ये गेल्या २ दिवसांपासून हल्लाबोल टास्क सुरु आहे. दरम्यान टीम ए आणि टीम बी’मध्ये चांगलाच शाब्दिक वाद पेटल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही टीममधले सदस्य टास्क जिंकण्यासाठी मेहनत करत आहेत. दरम्यान आज मोटर बाईकवर जय आणि गायत्री बसणार आहेत. त्यामुळे आता विरुध्द टीम जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार हे पाहायला मजा येईल. कारण विकास, विशाल, मीनल, आविष्कार, सोनाली आणि सुरेखाताई त्यांना बाईकवरुन उठवण्यात काय युक्ती लढवतील आणि कसे यशस्वी होतील यातील प्रेक्षकांचे लक्ष आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

दरम्यान या टास्कच्या पहिल्या भागात बाईकवर बसलेल्या सदस्यांचे चांगलेच हाल झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे आता हि टीम बदला घेते का काय? असा सूर दिसतोय. विशाल, विकास, मीनल, आविष्कार साबणाच पाणी टाकून जय आणि गायत्रीला बाईकवरून उठवण्याचा प्रयत्न करताना आज दिसतील. याशिवाय टास्क जिंकण्यासाठी ही टीम अजून काय प्रयत्न करणार हे तुम्ही येत्या एपिसोडमध्ये पाहू शकता. तर, या टास्क दरम्यान अक्षय आणि विशालमध्ये चांगलीच वादाची ठिणगी पडणार आहे. कारण अक्षयच्या अंगावर पाणी टाकल्याने तो विशालवर भडकतो आणि त्यांच्यामध्ये जोरदार तू तू मैं मैं होते. ज्यामध्ये अक्षय विशालला बोलणार आहे “मी दुसर्‍यांच्या डोक्याने नाही खेळत”. यानंतर विशाल कसे उत्तर देतो हे पाहणे रंजक ठरणार आहेत. आता हा वाद कुठेपर्यंत जाईल? पुढे हा वाद कुठे थांबेल? यांच पुढे काय होणार? कोण जिंकणार? कोण हरणार? हे आजच्या भागात समजणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या सगळ्या प्रकारादरम्यान घरातील एक सदस्य घरातून बाहेर पडली आहे. होय. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना येऊन एक आठवडा उलटला असताना आता या घरातून एका स्पर्धकाची वापसी झाल्याचे पाहायला मिळाले. हि स्पर्धक दुसरी तिसरी कुणी नसून कीर्तनकार शिवलेला पाटील आहे. याचे कारण असे कि, शिवलीला पाटील यांची प्रकृती अचानक ढासळली आहे. त्यामुळे बिग बॉस खेळाच्या नियमावलीनुसार आधी तब्येत मग खेळ. याकरिता ‘बिग बॉसने जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ शिवलीला बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाणे गरजेचे होते आणि त्या गेल्या.

Tags: Akshay waghmareBigg Boss Marathi 3Gayatri DatarJay DudhaneShivleela PatilVishal Nikam
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group