Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Bigg Boss मराठी 3- ‘हल्लाबोल’ टास्क जिंकल्यानंतर जय – गायत्री झाले ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 1, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकीकडे ‘बिग बॉस'(हिंदी) उद्यापासून सुरू होणार म्हणून सगळेच उत्सुक असताना दुसरीकडे ‘बिग बॉस मराठीलाही सॉलिड बोलबाला सुरु आहे. हा शो दररोज प्रेक्षकांचा वेगवेगळ्या पद्धतीने मन जिंकताना दिसतोय. पहिला आठवडा सरला आता दुसरा आठवडा संपत आलाय आणि घरातले वाद विवाद रोज थोडे थोडे वाढताना दिसत आहेत. नुकताच बिग बॉस मराठीमध्ये ‘हल्लाबोल’ हा टास्क पार पडला आणि यादरम्यान एकदम खतरनाक राडे झाल्याचे पाहायला मिळाले. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर हा टास्क जय – गायत्रीने जिंकलाच. पण टास्क जिंकल्यानंतर हि जोडी सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होताना दिसतेय.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 

‘बिग बॉस मराठीच्या घरात दुसऱ्या आठवड्याची ‘जोडी कि बेडी’ हि धमक थीम होती. या दरम्यान बिग बॉसच्या घरात एक भन्नाट टास्क पार पडला. या नव्या टास्कचं नाव होतं ‘हल्लाबोल’. हा नावाप्रमाणेच टास्क होता. दरम्यान आपल्या जोडीदारासोबत एका बाईकवर बसायचं आणि दुसऱ्या टीममधील स्पर्धक त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतील. असा हा टास्क होता. यात जी जोडी उठेल तीची हार होईल आणि जी टीम त्यांना उठवण्यात यशस्वी होईल. ती टीम जिंकेल असे काहीसे नियम होते. या टास्कमध्ये जय आणि गायत्रीने विजय मिळवला त्यामुळे त्यांच्या टीमने त्यांचं भरभरून कौतुक केलं. एवढंच काय तर दादूस आणि तृप्ती देसाईने या दोघांना आपलं लॉकेटसुद्धा अगदी भेट म्हणून देऊ केलं. मात्र टीम बी’ला हा निकाल मान्य नाही आणि इतकेच नव्हे तर प्रेक्षकांनासुद्धा हा निर्णय मान्य नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial)

या टास्कमध्ये ३ जोड्यांनी सहभाग घेतला. यात प्रथम सुरेखा – सोनाली बाईकवर बसलेल्या. दरम्यान त्यांच्यावर पाणी, पावडर, अंडी अश्या कितीतरी वस्तू टाकून उठवण्याचा प्रयत्न झाला. पण काही वेळ टिकून राहिलेली ही जोडी नंतर बाईकवरून उठली आणि टास्कबाहेर झाली. त्यानंतर विशाल – विकास हि जोडी बसली होती. या जोडीने संपूर्ण एक दिवस बाईकवर बसून हा टास्क सुंदररित्या खेळला. त्यानंतर समोरील टीममधून जय आणि गायत्री बाईकवर बसले आणि नंतर या जोडीतील गायत्री – जयच्या दोर तोडण्यात आला. त्यामुळे विकास – विशालचं म्हणणं होतं कि टास्क त्यांच्या टीमने जिंकला आहे. मात्र कॅप्टन उत्कर्षने जय – गायत्रीला विजेता घोषित केलं आणि यानंतर सोशल मीडियावर दणाणून टीका झाल्याचे पाहायला मिळाले.

   

प्रेक्षक इतके नाराज होते कि, प्रेक्षकांनी आपापल्या पद्धतीने उत्कर्ष, जय आणि गायत्री यांच्यावर ताशेरे ओढल्याचे पाहायला मिळाले. एका नेटकाऱ्याने लिहिले कि, अरे कसला बोलबाला जरा कमेंट्स वाचून पहा. तर अन्य एकाने लिहिले, हाकला यांना घरातून. इतकेच काय तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले कि, नालयाकपणाचा कळस. याशिवाय एका नेटकऱ्याने उत्कर्षवरच ताशेरे ओढत म्हटले कि कॅप्टनच पक्षपाती आहे.

Tags: Bigg Boss Marathi 3Gayatri DatarHalla Bol TaskJay DudhaneUtkarsh ShindeVikas PatilVishal Nikam
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group