हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वत किर्तनकार शिवलीला पाटील यांनी स्पर्धक म्हणून मोठ्या उत्साहाने भाग घेतला. मात्र यानंतर कुठेतरी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर शिवलीला आजारी काय पडल्या आणि घराबाहेरही झाल्या. अगदी स्वखुशीने स्व मर्जीने मी हे घर सोडतेय असे त्यांनी सांगितले. पण आता सोशल मीडियावर एक असा फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये असे लिहिलेले कि शिवलीला किर्तन करण्यासाठी सज्ज आहेत. मग काय? हे पाहिल्यावर सोशल मीडियावर चर्चाच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.
किर्तनकार शिवलीला पाटील यांचा एक व्हिडिओ बिग बॉसच्या चावडी स्पेशल भागात पाहायला मिळाला. यात त्यांची प्रकृती अधिकच खालावली असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय इतर स्पर्धकांना शुभेच्छा देऊन आपण अजूनही आजारातून बरे झालेलो नाही, अद्याप बरे वाटत नसल्याने बिग बॉसचा शो सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शिवलीलाच्या या निर्णयाचे प्रेक्षकांनी अगदी भरभरून स्वागत केले. मात्र आजारी असलेली आणि हॉस्पिटलमध्ये दाखल असलेली शिवलीला आता अचानक बारी कशी काय झाली? आणि चक्क किर्तन कशी काय करू शकते? असा सवाल अनेकांना पडला. या संदर्भातला एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यामुळे या चर्चाना उधाण आले.
या व्हायरल फोटोमध्ये कै. लता राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी समाज प्रबोधनकार ह.भ.प. शिवलीला ताई पाटील आता चक्क किर्तन करणार आहेत. एकीकडे आजारी असल्याचे कारण सांगून शिवलीला यांनी बिग बॉस मराठीच्या घरातून बुलेट ट्रेनसारखी एक्झिट घेतली आणि दुसरीकडे कीर्तनासाठी बऱ्या झाल्या? आजारी असताना त्या किर्तन करण्यासाठी सज्ज झाल्याचं कशा? असा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर विचारला. खरतर दिवस सरून गेला पण अजूनही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमागील सत्य उघडकीस आलेले नाही. कारण यावर अद्याप शिवलीला पाटील यांची कुठलीच प्रतिक्रिया मिळालेली नाही.
खरतर बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्यावर संप्रदायाच्या माध्यमातून अनेकांनी टीका केल्या होत्या. इतकेच काय तर, अनेकांनी त्यांना आता किर्तन न करण्याचा सल्ला देखील दिला होता. बहुतेक प्रेक्षकांची नाराजी विचारात घेऊन आजारपणाचे निमित्त तयार करून त्यांनी बिग बॉस मराठीला टांग दिली अशी भलतीच चर्चा आता सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे.
Discussion about this post