हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध नृत्यांगना आणि लोकप्रिय अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून एक व्हिडीओ शेअर करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपली व्यथा बोलून दाखवली आहे. सोबत एक आवाहन देखील केले आहे. वयाच्या ५६ व्या वर्षीसुद्धा सुधा चंद्रन यांना कोणत्याही विमानतळावर सिक्युरिटी चेकच्या प्रत्येकवेळी कृत्रिम पाय (Prosthetic Limb) काढून दाखवण्यास सांगितलं जातं. त्यामुळे व्यथित आणि संतापलेल्या सुधा चंद्रन यांनी वयोवृद्धांप्रमाणेच आपाल्यालाही एखादं कार्ड मिळावं अशी एक मागणी केली आहे. याशिवाय हि अशाप्रकारे मिळणारी वागणूक कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर CISFकडून माफी मागण्यात आली आहे. तसे त्यांनी ट्विट केले आहे.
अभिनेत्री नृत्यांगना सुद्धा चंद्रन यांनी सोशल मीडीयाच्या माध्यमातून एक व्हीडिओ पोस्ट करताना आपली हकिकत सांगताना म्हटले, ETD अर्थात Explosive Trace Detector द्वारा माझ्या कृत्रिम पायाची तपासणी करावी असं मी प्रत्येकवेळी CISF अधिकार्यांना सांगते. पण तरीही प्रत्येकवेळी कृत्रिम पाय काढून दाखवायला सांगितले जाते. मोदीजी मला सांगा हे मानवी दृष्टीने शक्य आहे का? तुम्हीच सांगा. हाच आपल्या समाजातील महिलांविषयीचा आदर आहे का? किमान मला एक असे वयोवृद्धांप्रमाणे कार्ड द्या जे दाखवल्यानंतर मला असे सहन करावे लागणार नाही. दरम्यान सुधा चंद्रन यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर CISFने माफी मागितली आहे आणि सुधा चंद्रन यांना अशाप्रकारे कृत्रिम पाय का काढायला सांगितलं? याची माहिती घेतली जाईल असे आश्वासित करण्यात आले.
CISF apologises to actor Sudhaa Chandran after she shared a video on being stopped at airport for prosthetic limb. "We'll examine why the lady personnel concerned requested Sudhaa Chandran to remove prosthetics & assure that no inconvenience is caused to travelling passengers." pic.twitter.com/oaVThYB0Lv
— ANI (@ANI) October 22, 2021
अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी हिंदी, कन्नड, मल्याळी, तेलगू आणि मराठी अश्या विविध भाषिक मालिका आणि चित्रपटांमध्ये अनेको भूमिका साकारल्या आहेत. शिवाय सुधा चंद्रन यांनी भरतनाट्यम शिकले आहे. त्या एक उत्तम नृत्यांगना म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. सुधा यांना नॅशनल फिल्म अवॉर्डने नावाजण्यात आले आहे. सुधा चंद्रन यांच्या आयुष्यावर ‘मयुरी’ हा तेलगू चित्रपट देखील बनवण्यात आला आहे. दरम्यान १९८१ साली सुधा चंद्रन यांचा तामिळनाडू मध्ये तिरुचिरापल्लीजवळ मद्रास वरून येताना अपघात झाला होता. या अपघातात त्यांनी एक पाय गमावला. पण म्हणून त्या थांबल्या नाहीत. उलट जिद्दीने स्वबळावर उभ्या राहिल्या आणि याचवेळी त्यांना कृत्रिम पाय बसवण्यात आला आहे.
Discussion about this post