हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या मुलीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Hoote लाँच केले आहे. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या ही या व्हॉईस-बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सह-संस्थापक आहे आणि त्यांच्यासोबत Amtex चे सीईओ सनी पोकाला आहेत. हे लॉन्च केल्यानंतर रजनीकांत यांनी ट्विट केले ‘Hoote – Voice based social media platform, from India for the world.’ याचा अर्थ असा की, Hoote हे भारतातून जगासाठी एक आवाजावर आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.
Hoote – Voice based social media platform, from India 🇮🇳 for the world 🌍🙏 https://t.co/Fuout7w2Tr
— Rajinikanth (@rajinikanth) October 25, 2021
या प्लॅटफॉर्मवर, तुम्ही 60 सेकंदांचे लाईव्ह व्हॉइस रेकॉर्डिंग अपलोड करू शकता किंवा प्री-रेकॉर्डिंग अपलोड करू शकता. सोमवारी दिल्लीत दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुपरस्टार रजनीकांत म्हणाले की,” हे अॅप लॉन्च करताना मलाही खूप आनंद होत आहे.” रजनीकांत म्हणाले की,” आता लोकं त्यांच्या आवाजातून त्यांचे विचार आणि इच्छा व्यक्त करू शकतील. जसे ते त्यांच्या आवडीच्या भाषेत लिहितात.” या सुपरस्टारची मुलगी असलेल्या सौंदर्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की,”सोशल मीडियाचे भविष्य हा आवाज आहे आणि माझा या गोष्टीवर खूप विश्वास आहे.” सौंदर्या म्हणाली की,”Hoote वर लोकं कोणत्याही भाषेत कधीही कुठूनही आपले विचार आणि भावना व्यक्त करू शकतात.”
Soundarya Rajinikanth discusses future plans at the launch of her social media app Hoote. Talks of the support she received from her father, superstar Rajinikanth. Listen to the exclusive conversation. | @pramodmadhav6 @soundaryaarajni #Thalaiva @rajinikanth @hooteofficial pic.twitter.com/ULLQ6vIfOe
— Business Today (@business_today) October 26, 2021
माहितीनुसार,Hoote आठ भाषांना सपोर्ट करतो आहे, ज्यात भारतीय आणि परदेशी दोन्ही भाषांचा समावेश आहे. तामिळ, हिंदी, तेलगू, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली आणि गुजराती या भारतीय भाषा म्हणून Hoote मध्ये डेडिकेटेड आहेत. Hoote अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहे की युझर्स काहीही टाइप न करता बोलून मेसेज पाठवू शकतील. याचा अर्थ Hoote हे व्हॉईस नोट अॅप आहे. एकदा व्हॉईस नोट रेकॉर्ड केल्यानंतर, युझर्स त्यांच्या आवडीनुसार म्युझिक आणि फोटोज जोडू शकतील.
Discussion about this post