हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीला साता समुद्रापार नेण्यास ज्यांचा हातभार आहे आणि ज्यांचं नाव प्रत्येक मराठी माणूस अतिशय अभिमानानं घेतो असे दिग्दर्शक, लेखक आणि कलाकार नागराज मंजुळे यांनी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे. ते नेहमीच त्यांच्या कलेमार्फत वेगवेगळया सामाजिक विषयांवर भाष्य करतात आणि अबोल विषयांना बोलके करतात. आतापर्यंत “फँड्री”, “सैराट”, “नाळ” तसेच “पावसाचा निबंध” या त्यांच्या अफलातून कलाकृतींना प्रेक्षकवर्गांनी अक्षरशः डोक्यावर घेतल आहे. या प्रत्येक चित्रपटाचे कथानक इतके आपलेसे होते कि हे चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाने त्या कथा जगल्या आहेत. यामुळे उत्तम कथानकाचे जाणकार म्हणून नागराज मंजुळे यांनी वेगळीच ओळख आहे. अश्यात त्यांनी अत्यंत चर्चेत असलेला आगामी मराठी चित्रपट “जयंती” चा ट्रेलर त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करीत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले आहे.
सध्या सोशल मीडियाचे माध्यम हे सोयीस्कर असल्यामुळे जयंती चित्रपटाचे प्रमोशन याच मार्गे केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. फेसबुकवर जयंतीचे “बॅज” लावून तयार केलेले स्वतःचे पोस्टर व्हायरल करणं जणू तरुणांनी फारच मनावर घेतल आहे. अगदी ताल धरायला लावणाऱ्या या सिनेमाच्या गाण्यांचे रिल्स बनवून तरुणवर्ग विविध प्रसार माध्यमांमध्ये चर्चेत येत आहेत. अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळया मार्गांनी आगामी मराठी चित्रपट “जयंती”चे प्रमोशन मोठ्या उत्साहात सुरु आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वांच्या उत्सुकतेत वाढ झाली आहे.
शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित “जयंती” हा मराठमोळा सिनेमा येत्या १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मागील आठवड्यात जयंती सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि यानंतर अगदी आठवड्याभरातच तब्बल १५ लाखाच्या वर लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. तसेच सिनेमाच्या २ गाण्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. “जयंती” सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता “ऋतुराज वानखेडे” आणि अभिनेत्री “तितिक्षा तावडे” मराठी सिनेसृष्टीत प्रथम पदार्पण करत आहेत. शिवाय या सिनेमामध्ये जेष्ठ अभिनेते वीरा साथीदार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, तसेच पॅडी कांबळे आणि अंजली जोगळेकर यांच्या देखील भूमिका आहेत.
Discussion about this post