चंदेरीदुनिया । गूगलने यंदाच्या वर्षीचे म्हणजे 2019चे सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्हायरल फोटोची यादी जाहीर केली आहे. गतवर्षी या यादीत साउथची स्टार प्रिया प्रकाश वॉरियर सर्वाधिक सर्च करण्यात आली होती.
यंदाच्या वर्षी इंटरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू मंडल यांच्या मेकअप लुक फोटोने बाजी मारली आहे. तर या यादीत हेमा मालिनी, आलिया भट्ट या बॉलिवूड सेलेब्ससह डोनाल्ड ट्रंप यांना रोखून बघताना ग्रेटा थनबर्ग तसेच जेव्हा परिक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्हणून विद्यार्थ्यांना चक्क रिकामी खोकी घालून परिक्षेला बसवण्या आलेले फोटो सुद्धा यंदाच्या वर्षी इंटरनेट सेंसेशन ठरले आहे.
‘एक प्यार का नगमा है’ हे प्रसिद्ध गाणे गातानाचा रानू मंडलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर प्रसिद्धिच्या झोतात आलेल्या रानू मंडलला थेट बॉलिवुडमध्ये गाणे गाण्याची संधी मिळाली. दरम्यान यंदाच्या वर्षात राणू मंडल यांनाचा मेकअप फोटो सोशल मीडियामध्ये चांगलाच सर्च करण्यात आला.
2019 लोकसभा निवडणुकीला सर्व पक्षातील नेत्यांनी हटके स्टाईलमध्ये प्रचार केला. प्रत्येक उमेदवार आपल्या वेगवेगळ्या उपायांनी मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच बॉलीवूड ड्रिमगर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील मतदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क ट्रॅक्टर चालवला आणि शेतातील गहू कापण्यास शेतकऱ्यांची मदत केली होती.
जम्मू काश्मीर येथे सीआरपीएफ महिला बरोबर हाथ मिळवतानाचा एका लहान चिमुकल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या फोटोला सर्व क्षेत्रातून कौतुक केले गेले
‘हाऊ डेअर यू…’ असा खडा सवाल जगभरातल्या शीर्षस्थ नेत्यांना करणारी अवघी सोळा वर्षांची निडर ग्रेटा थनबर्ग आठवते? हो, तीच. ग्रेटा थनबर्ग हिचा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांना घुरतांनाचा फोटो यंदाच्या वर्षात चांगलाच व्हायरल झाला आहे.
आलिया भट्ट सारखा दिसणार कॉमेडियन आणि यूट्यूब स्टारचा सध्या फोटो व्हायरल झाला. इंस्टाग्रामवर कॉमेडियन आणि यूट्यूब स्टार भुवन बामने स्वतःहा त्याचा फोटो शेअर केला ज्यात तो आलिया सारखाच दिसत होता या फोटोला सुद्धा लाखोंच्या घरात यंदाच्या वर्षात सर्च करण्यात आले.
कर्नाटकातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा देतानाचे फोटो यंदाच्या वर्षात सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील ‘भगत प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमधील’ हे फोटो आहेत. या महाविद्यालयात सध्या परिक्षा सुरू असताना परिक्षेत विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी विद्यार्थ्यांना चक्क रिकामी खोकी घालून परिक्षेला बसवण्यात आल्याचे दिसत आहे. या फोटोचा व्हिडीओ सुद्धा चांगलाच व्हायरल झाला होता.
Discussion about this post