हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी आणि बॉलिवूड दोन्ही इंडस्ट्री गाजवणारे दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी नेहमीच आपल्या चाहत्यांना आगळ्या वेगळ्या कथानकाचे सिनेमी दिले आहेत. त्यामुळे मांजरेकरांच्या चित्रपट येणार म्हटल्यानंतर अगदी प्रेक्षकसुद्धा चांगलेच खुश असतात. आपल्या वेगवेगळ्या कथेवर आणि दिग्दर्शनांवर जोर देत महेश मांजरेकर यांनी नेहमीच एक उत्तम सादरीकरण केले आहे. आपल्या कथानकांमध्ये वैविध्य राखीत मांजरेकर यांनी आजवर अनेक कलाकृती सादर केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा येणारा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी एक वेगळीच मेजवानीच असते. नुकताच त्यांचा अंतिम हा चित्रपट चांगलाच हिट ठरल्यानंतर आता नव्या वर्षात नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
चाळी झाल्या रे सपाट,
टॉवरचा थाटमाटशांघायच्या स्वप्नामधून आता डोळे जागले
कवल्या कवल्या जिंदगीला लंबे लंबे लागले
लेखक – जयंत पवार
दिग्दर्शक – महेश मांजरेकरनाय वरणभात लोन्चा
कोन नाय कोन्चा२१ जानेवारी, २०२२ पासून आपल्या जवळच्या थेटरात pic.twitter.com/4LglS6bs3O
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) December 8, 2021
तर प्रेक्षकवर्ग हो! आता नव्या वर्षात मांजरेकर घेऊन येतायत एक असा चित्रपट ज्याची एक हलकी झलक देण्यात आली आहे. एक नवा मराठी चित्रपट आणि एक नाव कथानक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असं काहीस वेगळंच शीर्षक असलेला हा चित्रपट २१ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. चित्रपटाच्या पोस्टरनंतर चित्रपटात कोणते कलाकार झळकणार? कोणता कलाकार कोणती भूमिका साकारणार? याकडे रसिक प्रेक्षकांच्या नजरा वळणे फार साहजिक आहे.
या चित्रपटाचा पोस्टर आणि टिझर रिलीज करताना मांजरेकरांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि,
चाळी झाल्या रे सपाट, टॉवरचा थाटमाट
शांघायच्या स्वप्नामधून आता डोळे जागले, कवल्या कवल्या जिंदगीला लंबे लंबे लागले.
लेखक – जयंत पवार. दिग्दर्शक – महेश मांजरेकर.
नाय वरणभात लोन्चा, कोन नाय कोन्चा. २१ जानेवारी, २०२२ पासून आपल्या जवळच्या थेटरात
त्यामुळे येत्या वर्षात २१ जानेवारी २०२२ रोजी थिएटरमध्ये जाऊन आगळ्या वेगळ्या कथानकाचा फुल्ल ऑन एंटरटेनमेंट असणारा नाय वरणभात लोन्चा, कोन नाय कोन्चा बघायला तयार रहा.
Discussion about this post