हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम तसे पहालं तर फारसा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह दिसत नाही, पण इंस्टाग्रामवर त्याच्या बऱ्याच पोस्ट वारंवार दिसतात. मात्र आता सूत्रांच्या माहितीनुसार नुकतच त्याच इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचे संकेत मिळाले आहेत. कारण त्याच्या अकाउंटवरून अचानक सर्व पोस्ट डिलीट झाल्या आहेत. परिणामी सोशल मीडियावरदेखील हीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर जॉनचे तब्बल ९ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यामुळे त्याचे चाहतेदेखील चांगलेच संभ्रमित झाले आहेत. सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय कि झालं तरी काय? खरंच अकाउंट हॅक झालय का जॉनने स्वतः पोस्ट डिलीट केल्या? याबाबत अद्याप कोणतीही माहिती जॉनने दिलेली नाही मात्र त्याच्या आगामी क चित्रपटाचा टिझर तर हेच सांगतो कि हा प्रमोशनल स्टंट होता.
अलीकडेच कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये हार्ट अटॅकबद्दल माहिती सांगितल्यामुळे जॉनला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. खरंतर जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस आणि रकुलप्रीत यांचा ‘अॅटॅक’ नावाचा एक चित्रपट येतोय. हा एक सुपर सोल्जर चित्रपट असून याचे दिग्दर्शन लक्ष्य राज आनंद करणार आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनासाठी जॉनने इंस्टा पोस्ट डिलीट केल्याची चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप याबाबत जॉनकडून वा त्याच्या निकटवर्तीयांकडून तरी कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही आहे. मात्र हा सर्व प्रकार चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असण्याची शक्यता काही नाकारता येत नाही. कारण या सर्व प्रकारानंतर नुकताच त्याने आगामी चित्रपटाचा टिझर रिलीज केला आहे. यानंतर तर अनेकांनी हा प्रमोशन स्टंटच आहे असे म्हटले आहे.
अजय कपूर प्रॉडक्शन निर्मित ‘अटॅक’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नांडिज आणि राकुल प्रीत सिंग दिसतील. या टीझरमध्ये दहशतवादाच्या प्रत्येक बारीक गोष्टी टिपल्या आहेत. यानंतर एक सोल्जर कश्या पद्धतीने आपल्या जीवाची बाजी लावतो आणि देशाची आन बान शान जपतो हे यात पाहायला मिळेल. एक सुपर सोल्जर आपल्याला पाहायला मिळेल. येत्या २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा सिनेमा चित्रपट गृहात रिलीज होईल. सध्या टीजर पाहून तरी लोकांनी टीजरपेक्षा अकाउंट हॅक झाल्याच्या अफवेवर नाराजी दाखवणे पसंत केले आहे.
अभिनेता जॉन अब्राहमचा वाढदिवस १७ डिसेंबरला आहे. यामुळे त्याच्या इंस्टावर त्याला फॉलो करणारे चाहते त्याचे अकाउंट हॅक झाल्याच्या बातमीने नाराज झाले होते. मात्र आता हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला असेल इतक नक्की. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने २००३ सालामध्ये ‘जिस्म’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने पाप, धूम, साया, गरम मसाला, दोस्ताना, काबुल एक्सप्रेस, नो स्मोकिंग, न्यूयॉर्क, फोर्स, देसी बॉईज, हाउसफुल २, मद्रास कॅफे, वेलकम बॅक, सत्यमेव जयते यांसारखे धमाकेदार चित्रपट केले आहेत.
Discussion about this post