हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी ३ आता निरोपाच्या वाटेकडे मार्गस्थ झाला आहे. एकीकडे प्रत्येक स्पर्धकाची जिंकायची जिद्द आणि दुसरीकडे शेवटपर्यंत येऊन बाद होण्याची भीती प्रत्येकाला भेडसावत आहे. गेल्या आठवड्यात घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी विकास पाटील, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे आणि सोनाली पाटील हे स्पर्धक नॉमिनेट झाले होते. आठवडाभर या स्पर्धकांच्या डोक्यावर एव्हिक्शनची टांगती तलवार होती. यानंतर अखेर ‘चावडी’ रंगली आणि बिग बॉस मराठीच्या घरातून कोल्हापूरची लवंगी मिरची सोनाली पाटील ९० दिवसांच्या प्रवासानंतर घरातून बाहेर पडली. यानंतर आता उरलाय फक्त एक आठवडा आणि या आठवड्यात आणखी एक एव्हिक्शन होणार आहे. त्यामुळे उरलेल्या स्पर्धकांची धाकधूक अजून थांबलेली नाही.
शनिवारच्या चावडीत ‘बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर यांनी नॉमिनेट स्पर्धक अर्थात विकास, उत्कर्ष, मीरा आणि सोनाली यांच्या बॅग्स बाहेर मागून जो वाचेल त्याची बॅग परत येईल असे सांगितले होते आणि रविवारी परतलेल्या बॅगेत ना सोनालीची बॅग होती ना सोनालीचे. यामुळे गेमच्या अगदी शेवटावर येऊन तिला हताश होत घराबाहेर पडावे लागले. यानंतर महेश मांजरेकर यांनी सोनालीला निरोप दिल्यानंतर एक घोषणा केली. हि घोषणा होती ‘बिग बॉस मराठीच्या घरातील शेवटच्या आठवड्यातील शेवटच्या एव्हिक्शनची. होय. आता घरात उरलेल्या सदस्यांपैकी आणखी एकाची विकेट जाणार हे निश्चित आहेत.
बिग बॉस मराठीच्या स्पर्धेत उरलेयत फक्त ६ स्पर्धक. जय दुधाणे, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शाह आणि विशाल निकम. यांपैकी विशाल निकम याने टिकिट टू फिनाले मिळवल्यामुळे तो थेट फायनलिस्ट झाला आहे. मात्र उरलेल्या ५ जणांपैकी एक या आठवड्यात एव्हीक्ट होणार हे नक्की. रविवारी रात्रीपासून वोटिंग लाईन्स सुरु करण्यात आल्या आहेत. या वोटिंग लाईन्स बुधवारी दुपारीपर्यंत सुरु राहतील आणि या वोटींगच्या अदहरे शेवटचे एव्हिक्शन पार पडेल. अर्थात बिग बॉस मराठी ३चे टॉप ५ फायनलिस्ट मिळवण्यासाठी आणखी एक स्पर्धक या आठवड्याच्या मध्यान्हात घराबाहेर होणार आहे. ‘बिग बॉस मराठीचा फिनाले सोहळा २६ डिसेंबर २०२१ रोजी होईल आणि आपल्याला ‘बिग बॉस मराठी ३ च्या विजेत्याचे नाव मिळेल.
Discussion about this post