Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गुगलच्या 2021 सालातील टॉप-10 सर्चमध्ये ‘या’ सेलिब्रेटींच्या नावाचा समावेश

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 21, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असणारे गुगल दरवर्षी त्या वर्षात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या लोकांच्या नावांची एक यादी जाहीर करते. यंदाही २०२१ सालातील सर्वाधिक सर्च सेलिब्रेटींची यादी आता गुगलने जाहीर केली आहे. यातील टॉप १० मध्ये काही सेलिब्रिटींचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया गुगलकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्च लिस्ट २०२१ मध्ये कोणाकोणाचा टॉप १० मध्ये समावेश आहे. खालीलप्रमाणे:-

View this post on Instagram

A post shared by Neeraj Chopra (@neeraj____chopra)

१) नीरज चोप्रा – या लिस्टमध्ये सर्वात पहिले स्थान नीरज चोप्राने मिळवले आहे. नीरज चोप्राला या वर्षात सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आले आहे. नीरज चोप्रा हा भारतीय अ‍ॅथलेटिक्स आहे. त्याने यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीच्या स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले होते.

View this post on Instagram

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

२) आर्यन खान – या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बॉलिवूड किंग खान अर्थात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आहे. आर्यन खान या वर्षातील सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटी ठरला. जेव्हापासून तो ड्रग्ज प्रकरणात पकडला गेला तेव्हापासून त्याचे नाव गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे. या प्रकरणात आर्यन खानला अनेक दिवस तुरुंगात रहावे लागले होते. आता तो तुरुंगातून बाहेर असला तरी त्याच्यावर खटला सुरू आहे.

View this post on Instagram

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

३) शहनाज गिल – या यादीतील तिसरे नाव टीव्ही अभिनेत्री शहनाज कौर गिलचे आहे. शहनाज गिल ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. यावर्षी अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक निधनानंतर ती चर्चेत आली होती. शहनाज आणि सिद्धार्थ हे दोघेही अत्यंत चांगले मित्र होते. शिवाय त्यांच्या अफेअरचीदेखील चर्चा होती. यामुळे सिद्धार्थच्या मृत्यूनंतर ती दुखावली होती आणि दोन महिन्यांनंतर सोशल मीडियावर पुन्हा आली. तिने सिद्धार्थ शुक्लाच्या श्रद्धांजलीचा व्हिडिओ शेअर केला होता. याच वर्षी शहनाजचा पहिला पंजाबी चित्रपट ‘हौसला रख’ देखील प्रदर्शित झाला होता जो खूप गाजला होता. या चित्रपटात शहनाज गिलसोबत दिलजीत दोसांझ प्रमुख भूमिकेत होता.

View this post on Instagram

A post shared by Viaan Raj Kundra (@viaanrajkundra)

४) राज कुंद्रा – या यादीत चौथा क्रमांक लागतो तो बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा पती राज कुंद्रा याचा. राज कुंद्रा याला काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपट बनवल्याबद्दल आणि काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रदर्शित केले. या प्रकरणात त्यांना अटकसुद्धा झाली होती. यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती.

View this post on Instagram

A post shared by E. M. (@elonofficiall)

५) एलोन मस्क – या यादीमध्ये पाचवा क्रमांक लागतो तो स्पेस एक्स कंपनीचे संस्थापक एलोन मस्क यांचा. एलोन मस्क हे टेस्ला कंपनीचे संस्थापकसुद्धा आहेत. त्यांनी टेस्ला कारची निर्मिती केली आहे. हि कार इलेक्ट्रिक आणि सोलरवर चालते.

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

६) विकी कौशल – या यादीमध्ये सहावा क्रमांक लागतो तो बॉलीवूड अभिनेता विकी कौशल याचा. अभिनेता विकी कौशल हा बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबतच्या लग्नामुळे त्याला गूगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा या ठिकाणी शाही थाटात पार पडला.

View this post on Instagram

A post shared by Sindhu Pv (@pvsindhu1)

७) पी.व्ही.सिंधू – या यादीमध्ये सातवा क्रमांक लागतो तो बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हीचा. पीव्ही सिंधू ही एक भारतीय व्यावसायिक बॅडमिंटनपटू आहे. तिने या वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. त्यामुळे या गुगलवर तिला सर्वाधिक सर्च करण्यात आले.

View this post on Instagram

A post shared by Bajrang Punia 🇮🇳 (@bajrangpunia60)

८) बजरंग पुनिया – या यादीमध्ये आठवा क्रमांक लागतो तो कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा. बजरंग पुनिया हा एक भारतीय फ्री स्टाईल कुस्तीपटू आहे. त्यानेदेखील टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sushil Kumar (@wrestlersushil)

९) सुशील कुमार – या यादीमध्ये नववा क्रमांक लागतो तो माजी भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार याचा. यावर्षी माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन सागर धनकर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी सुशील कुमार याला अटक करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

१०) नताशा दलाल – या यादीमध्ये दहावा क्रमांक लागतो तो नताशा दलाल हीचा. नताशा दलाल हि एक फॅशन डिझायनर आहे. तिने फेब्रुवारीमध्ये बॉलीवूड अभिनेता वरून धवन याच्यासोबत लग्न केले होते. वरून धवन आणि नताशा एकमेकांना खूप वर्षांपासून डेट करत होते. अलिबागमधील एका रिसॉर्टमध्ये त्यांचे हे लग्न पार पडले.

Tags: Aryan KhanGoogle Top 10Most Searched Celibritiesnatasha dalalRaj KundraShehnaj Gill KaurVicky Kaushal
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group