हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दादा कोंडकेंचा सदाबहार चित्रपट पांडू थोडा आधुनिकरीत्या हलके फुलके धमाल मनोरंजन करीत ३ डिसेंबर २०२१ रोजी संपूर्ण राज्यातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. यानंतर आता ५वा आठवडा सलग हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालताना दिसतोय. या चित्रपटातील पांडू महादूची भन्नाट जोडी १९७५ साली दादा कोंडके आणि अशोक सराफ या विनोदाच्या बादशहांनी गाजवली होती. यानंतर आता २०२१ मध्ये हि धुरा भालचंद्र कदम अर्थात भाऊ आणि कुशल बद्रिके या विनोदवीरांनी सांभाळली आहे. शिवाय चित्रपटातील अन्य पात्रांनी आपली भूमिका अव्वल बजावली असल्यामुळेच आज पांडूची वारी सब पे भारी झालीये. या चित्रपट मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनेदेखील एक अनोखी भूमिका साकारली असून या भूमिकेसाठी तिला मिळालेल्या प्रेमाबद्दल तिने दिग्दर्शक आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळीने करुणाताई पाठारे नामक भूमिका निभावली आहे. हि भूमिका नेहमीपेक्षा वेगळी आणि थोडी आव्हानात्मक असल्यामुळे प्राजक्तासाठी हि वेगळी संधी ठरली. चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी करुणाच्या भूमिकेसाठी प्राजक्ताची वर्णी लावणे हे तिला अपेक्षित नव्हते.
मात्र अखेर ठरलं कि हि भूमिका प्राजक्ता करणार आणि तिने अव्वलरित्या या भूमिकेला न्याय दिला आहे. यामुळे तिचे भरभरून कौतुक होत असताना ती दिग्दर्शक आणि प्रेक्षकांचे आभार मानायला विसरली नाही. तिने सोशल मीडियावर पोस्ट करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्राजक्ता माळीने सोशल मीडिया ट्विटर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करीत दिग्दर्शक, प्रोडक्शन आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. प्राजक्ताने आपल्या पोस्टमध्ये लिहिले कि, चित्रपट पांडू… ♥️. ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मला अतिशय वेगळ्या धाटणीची भुमिका करायला मिळाली, मी अस काही करू शकते; अस मलाही कधी वाटलं नव्हतं.
ह्याचं संपुर्ण श्रेय विजू सरांना @vijumaneofficial आणि @zeestudiosofficial team ला जातं. कमी चित्रपटगृहात होईना पण चित्रपट ५व्या आठवड्यातही चमकतोय.. ज्यांचा बघायचा राहिलाय त्यांनी जाऊन बघून,खळखळून हसून या. 😇.आणि प्रेक्षकांचे खूप आभार की त्यांनी अशा भूमिकेतही मला स्वीकारल…(तुमचं प्रेम आहे म्हणूनच धाडसी गोष्टी करू शकते.)
Discussion about this post