हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीने न जाणे कित्येक हुन्नरी कलाकारांना गमावले आहे. यामुळे आधीच मनोरंजन सृष्टी दुखवट्यात असताना आता पुन्हा एकदा दुःखाची शोककळा पसरली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माता विजय गलानी यांचे निधन झाले आहे. माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून ते ब्लड कॅन्सरसारख्या महाभयंकर रोगाशी झुंज देत होते. दरम्यान लंडनमध्ये त्यांच्यावर ब्लड कॅन्सरवरील उपचार सुरु होते. सलमान खानचा १९९२ साली प्रदर्शित झालेल्या सूर्यवंशी चित्रपटाची निर्मिती गलानी यांनी केली होती.
बॉलिवूड निर्माते विजय गलानी दीर्घकाळापासून ब्लड कॅन्सरने ग्रासलेले होते. दरम्यान लंडनमध्ये त्यांच्यावर गरजेचे सर्व उपचार होत असताना त्यांची लढत अपयशी ठरली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय गलानी गेल्या ३ महिन्यांपासून त्यांच्या कुटुंबासह बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी लंडन येथे राहत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांना कळले की ते स्वतः ब्लड कॅन्सरने ग्रस्त आहेत. यानंतर अखेर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
RIP producer #VijayGalani Sahab!🙏🏼 pic.twitter.com/jq9JfB3XAn
— KRK (@kamaalrkhan) December 30, 2021
विजय गलानी हे बॉलिवूडमधील एक यशस्वी निर्माता म्हणून ओळखले जात होते. त्यांचे अनेक कलाकारांसोबत खूप घनिष्ट संबंध होते. गलानी यांनी १९९२ साली प्रदर्शित झालेला सूर्यवंशी, १९९८ साली प्रदर्शित झालेला अचानक या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर २००१ साली ‘अजनबी’ सारख्या लोकप्रिय चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे. यामध्ये अक्षय कुमार, बॉबी देओल, करिना कपूर आणि बिपाशा बसू या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार, गोविंदा, बॉबी देओल यांसारख्या कलाकरांसोबत गलानी यांनी अनेक हिट पे हिट चित्रपट बनवले आहेत.
Discussion about this post