हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आता वर्ष २०२१ला निरोप द्यायची वेळ आली आहे. सध्या सगळीकडे २०२२च्या स्वागताची तयारी सुरु आहे. अनेकजण येणारे नवीन वर्ष वेगळ्या पद्धतीने साजरे करण्याचे विविध प्लॅनिंग करत आहेत. पण सरत्या वर्षाला विसरून कसे चालेल? २०२१ या संपूर्ण वर्षभरात बॉलिवूडमध्ये बायोपिक्सने धम्माल उडवली आहे. आजकाल दिग्दर्शक बायोपिक बनवण्यावर भर देताना दिसतात. यात काही वादच नाही. त्यामुळे २०२१ अक्षरशः बायोपिक्सने गाजवलं. चला तर जाणून घेऊयात या वर्षभरात कोरोनावर मात करून कोणकोणत्या बायोपिक्सने मनोरंजनाची प्रथा कायम राखली आहे ते खालीलप्रमाणे:-
१) सायना – सायना नेहवाल ही बॅडमिंटन पटू असून तिने तरुण पिढीला या खेळाची नव्या पद्धतीने ओळख करून दिली. त्यामुळे तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. तिच्यावर बनलेल्या बायोपिकचे नाव ‘सायना’ असून यात परिणीती चोप्राने मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट Amazon Prime वर २६ मार्च २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. परिणितीचा लूक हुबेहूब सायनासारखाच होता.
https://www.instagram.com/p/CU7nmMcDYU3/?utm_source=ig_web_copy_link
२) द बिग बुल – ‘द बिग बुल’ हा स्टॉक ब्रोकर हर्षद मेहताच्या जीवनावर आधारित एक फायनान्स थ्रिलर सिनेमा आहे. यात अभिनेता अभिषेक बच्चन याने हर्षद मेहताची भूमिका साकारली आहे. यामध्ये त्याच्यासोबत इलियाना डिक्रूझ, राम कपूर, सौरभ शुक्ला असे अनेक कलाकार आहेत. Disney Hotstar Plusवर हा चित्रपट ८ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता.
३) शेरशाह – शेरशाह हा चित्रपट कॅप्टन विक्रम बत्रा यांचे देशप्रेम आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घटना दर्शविणारा आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्रां आणि त्यांची गर्लफ्रेंड डिंपलची भूमिका अभिनेत्री कियारा अडवाणीने साकारली आहे. हा चित्रपट १२ ऑगस्ट २०२१ Amazon Prime Video वर रिलीज झाला होता. या चित्रपटाची प्रचंड लोकप्रियता आहे.
४) सरदार उधम – ‘सरदार उधम’ हा या वर्षातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक असून तो १६ ऑक्टोबर २०२१ रोजी Amazon Prime Videoवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत होता. सरदार उधम हे एक स्वातंत्र्य सेनानी होता आणि हा चित्रपट त्यांचा बायोपिक आहे. सरदार उधम यांची देशभक्ती या चित्रपटात दाखवली आहे.
५) थलायवी – ‘थलायवी’मध्ये जे.जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणी अशा जीवनप्रवासाची झलक दाखवली आहे. या चित्रपटात जे. जयललिता यांचा अभिनेत्री ते राजकारणात येण्याचा प्रवास हुबेहूब दर्शवला आहे. हा चित्रपट १० डिसेंबर २०२१ला Netflixवर प्रदर्शित झाला होता. ए.एल विजय यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौतने जे. जयललिता यांची भूमिका साकारली आहे.
Discussion about this post