हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बिग बॉस मराठीचा तीसरा सीजन इतका भन्नाट होता की सीजन संपला पण चर्चा अजूनही कायम आहे. त्यामुळे बिग बॉसच्या तिसऱ्या सीजन मधील प्रत्येक स्पर्धक चांगलाच गाजला. आजही अजूनही हे स्पर्धक अर्थात या व्यक्ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय करत आहेत, याबाबत त्यांना अगदीच उत्सुकता असते. या सिजनमध्ये समाजसेविका तृप्ती देसाई यांचाही समावेश होता. त्यांचे व्यक्तिमत्व लोकांनी फार जवळून पहिले. त्या १५ स्पर्धकांपैकी एक तृप्ती यांनी खूप वेगळे आयुष्य जगले. आपल्या आयुष्यात अनेक लोक भेटले ज्यांनी समजण्यात चूक केली याबाबत सांगताना तृप्ती देसाईंनी बिग बॉस मराठी ३ च्या घरातील अनुभव सांगणारी एक पोस्ट केली आहे. याशिवाय त्यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची हि पोस्ट सध्या फेसबुकवर चर्चेत आहे.
तृप्ती देसाई यांनी आपल्या सोशल मीडिया फेसबुकवर पोस्ट लिहिताना म्हटले आहे कि, याआधी महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय पातळीवर मला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली होतीच …. परंतु यावर्षी बिग बॉसच्या घरात जाण्याचा योग आला आणि मी दैनंदिन जीवनात कशी आहे, हे सर्वांना पाहायला मिळाले. त्यामुळे विनाकारण होणारे ट्रोलिंग यात मोठ्या प्रमाणात फरक झाला. अनेक ट्रोलिंग करणारे विरोधक फोन करून माफी मागायला लागले. मी माणूस म्हणून कशी आहे, हे सर्वांना समजले….
पुढे म्हणाल्या, … आणि आता तर बिगबॉसच्या माध्यमातून घराघरात पोहोचल्यामुळे लहान मुले, तरूण- तरुणी, महिला, पुरुष आणि वयोवृद्ध सर्वच जण मी जिथे भेटेल तिथे माझं कौतुक करतात, आशिर्वाद देतात. याहून आणखी काय पाहिजे असतं आपल्या आयुष्यात? या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे आणि जी परिस्थिती येईल त्याला ताकदीने सामोरे जावे असे मी मानते…… 2021 हे वर्ष माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी वेगळे आणि कायमस्वरूपी आठवणीत राहणारे ठरेल.. सर्वांना (2022) नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा..- सौ तृप्तीताई देसाई (संस्थापक अध्यक्षा- भूमाता ब्रिगेड, भूमाता फाऊंडेशन). देसाईंची हि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
Discussion about this post