Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

घरातलं कुणी गेल्यावर…; माईंच्या निधनानंतर तेजस्विनी पंडितने लिहून व्यक्त केल्या शोकसंवेदना

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 5, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
Sindhutai Sapkal
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनाथांच्या डोक्यावर मायेचा हात ठेवून त्यांना नवे जीवन देणाऱ्या ज्येष्ठ समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री ०८ वाजून १० मिनिटांनी निधन झाले. रिपोर्टनुसार, पुण्याच्या गॅलेक्सी रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. दरम्यान त्या ७४ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात असून यात राजकीय नेते, कलाविश्वातील कलाकार आणि माईंची लेकरं अशा प्रत्येकाचा समावेश आहे. त्यांचे निधन अगदीच चटका लावणारे ठरले आहे.

दरम्यान सिंधुताईंच्या जीवनाचे भाष्य करणारा चित्रपट ‘मी सिंधुताई सपकाळ’ यामध्ये त्यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित देखील भावुक झाली आहे. तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. यावेळी तिने तू पोस्ट लिहिली नाहीस असे विचारणाऱ्यांना घरातील कुणी गेल्यावर पोस्ट करण्याची मनःस्थिती असते का असा सवाल केला आहे. शिवाय माईंविषयीची आत्मियता तिने व्यक्त केली. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे कि,

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

– अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस….पोस्ट नाही केलं ?
पटकन judge करतो ना आपण त्यांच्या social media वरुन माणसाला ?
पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर social media वर पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो ?!
माझीही काहीशी अशीच अवस्था झाली.
रात्री ममता ताईच्या ph वरुन बातमी confirm झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते.
खूप वेळ ph वाजत होता. प्रतिक्रियेसाठी.काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले….कारण ती वेळ खरंच नाजूक होती.
माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही….पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते, की तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला….कधीच कुणाला नावाने हाक न मारता “बाळा” म्हणणार्‍या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या “मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस !
“अभिनेत्री” म्हणून ,एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ ह्या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले.
अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते , त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारी चा का असेना पण मला वाटा उचलता आला.
आणि एक व्यक्ति म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी screen वर जगू शकले त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच ! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई.
महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला…! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल. आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील.
लोकहो एक विनंती….
घाई घाई ने RIP लिहिण्याच्या ह्या जगात
त्यांचंही एक कुटुंब आहे (आणि ते खूप मोठं आहे) ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे ह्याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे… त्यांना वेळ द्या. Let them atleast have some time to mourn on a family members death.
तब्येत बरी नसल्यामुळे उद्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही पण ईश्वर चरणी प्रार्थना- माईंच्या आत्म्यास शांती लाभो. आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदन च्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो.
ओम शांती.
माई….
– तुमचीच चिंधी, सिंधुताई आणि माई

Tags: Emotional Post ViralLate Sindhutai SapkalMarathi ActressSocial Media PostTejaswwini Pandit
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group