हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा गाजलेला चित्रपट बजरंगी भाईजान आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. या चित्रपटामधील मुन्नी म्हणजेच अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा हिला राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांच्या हस्ते ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले आहे.
बॉलिवुड अभिनेता सलमान खानसोबत बजरंगी भाईजानमध्ये हर्षालीने पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली होती. यामध्ये तिची मुन्नी ही भूमिका होती. तिची ही भूमिका आजही चांगलीच लोकप्रिय आहे. हर्षाली सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. ती नेहमीच इन्स्टा रील्स आणि व्हिडिओ बनवताना दिसते. तिने आपल्याला मिळालेल्या पुरस्काराची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्याचा अभिमान वाटतो.
सोशल मीडियावर हर्षालीचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. तिला याआधीही काही पुरस्कार मिळाले आहेत. यात हर्षालीने ‘बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट स्क्रीन अवॉर्ड, झी सिने बेस्ट फिमेल डेब्यू अॅवॉर्ड मिळवले आहेत. ‘बजरंगी भाईजान’मध्ये क्यूट, सुंदर दिसणारी मुन्नी सर्वांनाच भावली आणि यानंतर हर्षालीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिला बजरंगी भाईजानसाठीच स्क्रीन अॅवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत तिने कबूल है, लौट आओ तृषा, सावधान इंडिया अशा मालिका, शोमध्ये काम केले आहे.
Discussion about this post