हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शुक्रवारी (१४ जानेवारी २०२२ रोजी) प्रदर्शित होऊ घातलेला चित्रपट ‘नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा’मधील काही दृश्यांवरून उफाळलेला वाद तक्रारींच्या कचाट्यात सापडला आहे. याविरोधात राज्य महिला आगोगापासून ते माहिती आणि प्रसारण मंत्रालयापर्यंत तक्रारी झाल्या असून चित्रपट वादात अडकला आहे. शिवाय सोशल मीडियावरदेखील संबंधित प्रकरणावरून जोरदार टीका सुरु आहेत. यानंतर अखेर चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितले कि, समाजातील विविध माध्यमातून उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा मान राखून चित्रपटाच्या प्रोमोमधील आक्षेपार्ह वाटणारी दृश्ये काढून टाकली आहेत. यानंतर सुधारीत प्रोमो सर्वांना पाठवण्यात येईल. यामुळे हा वाद इथेच मिटेल अशी आशा आहे.
View this post on Instagram
याविषयी मांजरेकर म्हणाले की, ‘नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर समाजातील बऱ्याच स्तरामधून विविध प्रतिक्रिया उमटल्या. हा चित्रपट १८ वयोवर्षेपुढील लोकांसाठी असल्याने सेन्सॉर बोर्डाने याला ‘ए’ प्रमाणपत्र दिले आहे. चित्रपटाच्या प्रोमोमधील काही दृश्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप घेतला आहे. मात्र यातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. तरी या प्रतिक्रियांचा मान राखत आम्ही प्रोमोमधील आक्षेपार्ह वाटणारी दृश्ये काढून टाकली आहेत आणि सुधारीत प्रोमो लवकरच सर्वांना पाठवू. शिवाय जुना प्रोमो काढून नवीन प्रोमो प्रदर्शित करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आली आहे.
View this post on Instagram
पुढे म्हणाले, चित्रपटाच्या निर्मिती संस्थेपासून अगदी लेखक-दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ असे आम्ही सर्वजण स्त्रियांचा मनापासून आदर करतो. त्यामुळे यातून कुठल्याही प्रकारचा चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. तसेच प्रोमोच्या माध्यमातून चुकीचा संदेश जाणार नाही, याची कटाक्षाने खबरदारी घेतली गेली होती. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही त्याबाबत मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. हि आक्षेपार्ह दृश्ये प्रोमोसह चित्रपटामधूनही काढली आहेत. शिवाय भविष्यात अडचणीची ठरतील अशीही दृश्ये आम्ही वगळत आहोत. या चित्रपटाची प्रसिद्धी सुरू केल्यापासून हा चित्रपट केवळ प्रौढांसाठी आहे हे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जे प्रेक्षक यात दाखवण्यात आलेली वास्तवता, गांभीर्य लक्षात घेऊ शकतात त्यांनीच हा चित्रपट पाहावा, अशी विनंती आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘नाय वरणभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट शुक्रवार १४ जानेवारी २०२०० रोजी प्रदर्शित होत आहे. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर त्यातील भडक दृश्यांवर सोशल मीडियावर चर्चा झाली होती.
महेश मांजरेकर यांच्या 'नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटाचे प्रकाशित करण्यात आलेल्या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला 1/2 pic.twitter.com/RqZEfKvAAM
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 13, 2022
त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिलेची आक्षेपार्ह स्थितीमधील दृश्य दाखवण्यात आली होती. त्यामुळॆ त्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. यानंतर महिला आयोगाने माहिती प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली होती.
Discussion about this post