Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या नव्या पोस्टरमधून विलास पाटील गायब; पहा पोस्टर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 15, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mulgi Zali Ho
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध राजकीय आणि सामजिक विषयांवर प्रखर भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेतुन हकालपट्टी करण्यात आली आहे. आपण घेत असलेल्या राजकीय भूमिकांमुळेच आपल्याला मालिकेतून काढण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केल्यानंतर सर्व स्तरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर निर्मात्यांनी हा विषय उडवून लावत व्यावसायिक कारणामुळे मानेंना मालिकेतून काढल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मुख्य म्हणजे आता या मालिकेचे नवे पोस्टर देखील रिलीज झाले आहे. ज्यामध्ये विलास पाटील अर्थात अभिनेता किरण माने नाहीत.

View this post on Instagram

A post shared by marathi entertainment (@_marathientertainment)

या पोस्टरमध्ये आपण पाहू शकता कि केवळ मालिकेतील नायिका आणि नायक दिसत आहेत. याआधी कथेच्या अनुषंगाने मालिकेचे पोस्टर होते. ज्यामध्ये नायिका आणि तिचे आई वडील दिसत होते. मात्र आता या पोस्टरमधून किरण मानेंना काढून टाकल्याचे दिसत आहे. मालिकेतून अचानक काढून टाकल्यानंतर आपल्याला राजकीय भूमिका घेतल्यामुळे काढलं असा आरोप मानेंनी केला होता. याबाबत संपूर्ण दिवसभर सर्व स्तरांतून चर्चा सुरु होती. अनेक राजकीय नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर अखेर निर्मात्यांनी मौन सोडले आणि व्यावसायिक कारणं असल्याचे स्पष्टीकरण दिले. यामुळे सध्या राजकीय पोस्ट वा राजकीय भूमिका घेतल्यानं माने यांना मालिकेतून काढण्यात आलेलं नाही, हा संदेश जावा, असा प्रयत्न होत असल्याची चर्चा रंगली आहे.

या दरम्यान, अजूनही चॅनेल किंवा निर्मात्यांनी मात्र नेमकी व्यावसायिक कारण देताना कोणत्या बाबी किरण माने यांच्याबाबत खटकल्या हे अद्याप स्पष्ट सांगितलेलं नाही. मात्र ‘मुलगी झाली हो’ मालिकेत विलास पाटील नामक भूमिका साकारणाऱ्या किरण माने यांची भूमिका अत्यंत लोकप्रिय असूनही त्यांना मालिकेतून बाहेर करण्यात आले याबाबत अजूनही प्रश्न असेच अनुत्तरित आहेत. म्हणून किरण माने यांची मालिकेतून हकालपट्टी झाल्यानंतर मराठी कलाकार आणि राजकीय भूमिका हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली होती. यात त्यांनी “काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा.गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा,” असे म्हटले होते. यानंतर माध्यमांशी बोलताना मी जाब विचारणारच. उद्या राहुल गांधी आणि शरद पवारांची सत्ता आली तरीही मी बोलणारच हा माझा हक्क आहे असे त्यांनी सांगितले.

Tags: Kiran ManeLatest Postermarathi actorMulgi Zali Ho Famestar pravah
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group