हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिगदर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असं काहीस वेगळंच शीर्षक असलेला हा चित्रपट १४ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला असून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अलीकडेच चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत राज्य महिला आयोगाने मांजरेकरांकडे स्पष्टीकरण मागितले होते. यानंतर ट्रेलरमधील दृश्ये हटविण्यात आली. यानंतर आता भारतीय स्त्री शक्ती संघटनेने या चित्रपटाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करीत चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.
भारतीय स्त्री शक्ती संघटनेकडून थेट नागपूर खंडपीठात या चित्रपटावर आक्षेप घेण्यात आला आहे. दरम्यान दाखल केलेल्या याचिकेत ‘‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’या चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या अडचणीत वाढ झाली आहे. हि याचिका दाखल करण्यामागे चित्रपटातील काही दृश्ये कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात अल्पवयीन मुलांना आक्षेपार्ह अवस्थेत दाखवण्यात आलं आहे. अशा दृश्यांवर आक्षेप घेत आधीच अनेकांनी निषेध नोंदवला होता. यासाठी मांजरेकरांनी ट्रेलर आणि चित्रपटातील अशी दृश्ये काढली आहेत असे सांगितले होते. यानंतरही संघटनेने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
View this post on Instagram
माहितीनुसार, नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या कथेवर मांजरेकरांचा ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे संपूर्ण कथानक हे मुंबईतील गिरणी कामगारांच्या आयुष्यावर आधारित असल्याची माहिती आहे. शिवाय या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चांगलाच चर्चेत आला होता. यानंतर आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक तरुणांनी हा चित्रपट डोक्यावर उचलून घेतला आहे. मात्र ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट पुन्हा एकदा चांगलाच वादात सापडला आहे. यातील काही बोल्ड सीन आणि आक्षेपार्ह दृश्यांमुळे याआधी महिला आयोगाने चित्रपटावर नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता कायदेशीर अडचणीत चित्रपट अडकल्याचे दिसून येत आहे.
Discussion about this post